Pune Crime | बोपदेव घाटातील तरुणाच्या खूनाचा उलगडा, मित्रांकडून चुकून गोळी उडाल्याने तरुणाचा मृत्यू; गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बोपदेव घाटात झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचा (Bopdev Ghat Murder Case) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचने (Pune Police Crime Branch Unit 5) उलगडा करत तीन जणांना अटक (Arrest) केली आहे. मित्रांकडून चुकून गावठी पिस्तूलातून गोळी (Firing) उडाल्याने गणेश नाना मुळे (वय 21, रा. सातववाडी, हडपसर) याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
या खुनप्रकरणी योगेश सुभाष भिलारे (वय-24), रोहन राजेंद्र गायकवाड (वय-23), अक्षय संदीप गंगावणे (वय-21) यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. मयत गणेश मुळे आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र होते.
गणेश रविवारी घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह कात्रज जवळील बोपदेव घाटात सापडला. गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून या प्रकरणाचा तपास केला जात होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून देशी बनावटीच्या पिस्तुलातून चुकून उडालेली गोळी मुळेला लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या मित्रांनी चौकशीदरम्यान सांगितले. तसेच त्याचा मृतदेह बोपदेव घाटात टाकून दिल्याची माहिती मित्रांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokle),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील
(Police Inspector Hemant Patil), उपनिरीक्षक चैत्राली गपाट (PSI Chaitrali Gapat), प्रमोद टिळेकर,
प्रताप गायकवाड, राहुल ढमढेरे, रमेश साबळे, अमित कांबळे यांच्या पथकाने केली.
Web Title :-Pune Crime | three arrested for shooting a young man with a pistol pune crime news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Sanjay Raut | राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो, तर…; संजय राऊतांनी उपस्थित केला सवाल