Pune Crime | सुपारी देणार्‍या विवेक यादवची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची; जाणून घ्या बबलू गवळी अन् यादवमधील वैमनस्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pune Crime | पूर्ववैमनस्यातून बदला घेण्यासाठी शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला सुपारी देणार्‍या कँटोंमेंटचा माजी नगरसेवक विवेक यादव (Former BJP corporator of Lashkar Cantonment Board Vivek Mahadev Yadav, pune) याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी (Crime) स्वरुपाची असून त्याला पोलिसांनी तडीपारही केले होते. तशात तो उच्च न्यायालयातून तडीपारीला स्टे मिळवून 2015 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला होता. गेल्या 5 दिवसांपासून कोंढवा पोलीस (Kondhwa Police) त्याचा शोध घेत असून तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. राजन राजमणी याला पकडल्याचे समजताच तो फरार( Pune Crime) झाला आहे.

उत्सव संवर्धन मंडळाचा अध्यक्ष व भाजपचा नगरसेवक असताना 2016 मध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत विवेक यादव (Vivek Mahadev Yadav, Pune) याच्यावर बबलु गवळी (Bablu Gavli) याने गोळीबार केला होता. या गोळीबारातून यादव थोडक्यात बचावला होता. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी (Lashkar Police) गवळी टोळीच्या 13 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. संवर्धन मंडळाचा गणपती हॉटेल ट्रायलक चौकातून (triluck chowk camp pune) पुढे आला.

त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन बबलु गवळी याने काही अंतरावरुन विवेक यादव (Vivek Mahadev Yadav, Pune) याच्यावर पाठीमागून पिस्तुलातून गोळी झाली. त्यावेळी हा प्रकार यादव याच्या भाच्याला दिसला. त्याने झडप घालून गवळीला पकडण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गवळी याने गोळी झाडली होती. गवळीला धक्का लागल्याने त्याचा नेम चुकला. गोळीच्या आवाजाने नागरिक सैरावैरा धावू लागल्याने गवळीला दुसरी गोळी झाडता आली नाही. तोपर्यंत यादव याच्या कार्यकर्त्यांनी गवळीला पकडून जबर मारहाण करीत पोलिसांच्या हवाली केले होते.

गवळी आणि यादव यांच्यामध्ये 2014 पासून विविध कारणावरुन भांडणे झाली आहेत.

कँटोन्मेंट बोर्डाकडून बेकायदेशीर पार्किंग शुल्क वसुलीची प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा यादव याने केला होता. विवेक यादव याच्याविरुद्ध दहशत पसरवणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, खंडणी (extortion), इतर काही अशा विविध गुन्ह्यात न्यायालयात खटले सुरु होते. तसेच तत्कालीन परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे (Deputy Commissioner Of Police Dr. Sudhakar Pathare) यांनी यादव याला 4 ऑक्टोंबर 2014 रोजी 2 वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते.

त्याविरुद्ध त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यावर स्थगिती मिळविली होती.
त्यामुळे तो पुणे जिल्ह्यात प्रवेश करु शकला होता.
2015 मध्ये झालेल्या पुणे कँटोंमेंटच्या बोर्डाच्या निवडणुकीत (Pune Cantonment Board Elections) तडीपारीचा शिक्का असताना भाजपने (BJP) त्याला तिकीट दिले.
त्यात तो निवडून आला होता.

त्यानंतर पुढच्या वर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत त्याच्यावर बबलु गवळीने गोळीबार केला होता.
त्यात तो सुदैवाने वाचला होता. त्याचा राग त्याला होता.
त्यातूनच त्याने शिक्षा भोगत असलेल्या राजन राजमणी याला हाताशी धरून गवळीचा काटा काढण्याचा कट रचला होता.
मात्र, पोलिसांनी अगोदरच कारवाई करुन त्याचा हा कट उद्धवस्त केला.

Web Title : Pune Crime | Vivek Yadav, who gave betel nuts, also has a criminal background; Learn the animosity between Bablu Gawli and Yadav

Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव

Scholarship Online Application | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन !