Pune Crime | काय सांगता… पोपटाच्या नादापायी गमाविले एक लाख रुपये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- Pune Crime | पक्षी पाळण्याचा छंद काहीवेळेस अंगलट येण्याची शक्यता असते. असाच एक अनुभव वानवडीतील (Wanavadi) तरूणाला आला असून त्याने पोपट (Parrot) विकत घेण्यासाठी ऑनलाईनरित्या तब्बल एक लाख रूपये (Pune Crime) गमाविले आहेत. संबंधित चोरट्यांनी तरूणाकडून रक्कम स्वीकारून पोपट न देता तरूणाचा चांगलाच पोपट केला आहे.

अक्षय देशमुख Akshay Deshmukh (वय 28) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात (Wanavadi Police Station) तक्रार दाखल केली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयला पक्षी पाळण्याचा छंद असून त्याने सप्टेंबर 2021 मध्ये ऑनलाईनरित्या पोपट विक्रीची जाहिरात पाहिली होती. त्यानुसार अक्षयने संबंधिताला फोन करून पोपट विकत घेण्याबाबत चर्चा केली. त्यावेळी आरोपींनी त्यांना ऑनलाईनरित्या एक लाख रूपये पाठविल्यास दोन पोपट पाठवून देतो असे सांगितले. त्यांच्या आमिषाला बळी पडून अक्षयने संबंधितांच्या बँक खात्यावर ऑनलाईनरित्या एक लाख रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर चोरट्यांनी पोपट न पाठविता फसवणूक केली आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | What can you say… one lakh rupees lost due to the sound of a parrot

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा