Pune Crime | मॉर्निग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा कालव्यात बुडून मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  शहरातील नीरा डावा कालव्यामध्ये (Nira Canal) पाय घसरून पडल्याने (Falling into Canal) एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. ही घटना गुरुवारी (दि.9) सकाळी घडली. सरस्वती गुणवंत तोंडारे Saraswati Gunwant Tondare (वय – 67 रा. भिगवण) असे या महिलेचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी सरस्वती या आपल्या मुलीकडे ओझर्डे इस्टेट (Ozarde Estate) येथे आल्या होत्या. आज सकाळी सातच्या सुमारास फिरायला त्या नीरा डावा कालव्याच्या भरावावर गेल्या होत्या. चालताना पाय घसरुन त्या पाण्यात पडल्या व त्यातच त्यांचा मृत्यू (Pune Crime)  झाला. त्यांचे पती हे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी (Retired Police Personnel) आहेत.

 

आज सकाळी परकाळे बंगल्यानजिक असलेल्या पूलाजवळ एका महिलेचा मृतदेह दिसल्यानंतर बीट मार्शल ठोंबरे (Beat Marshall Thombre), मनोज पवार (Manoj Pawar) यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तो वर काढला. त्यानंतर त्याची ओळख पटवण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) यांनी सांगितले. (Pune Crime)

 

कालव्याचे अस्तरीकरण बेततेय जीवावर

बारामतीत कालव्याला सिमेंटच्या स्लॅबचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कालव्यात एखादी व्यक्ती पडल्यास तिला वर येता येत नाही. सिमेंटच्या अस्तरीकरणामुळे एखाद्या व्यक्तीने वर येण्याचा प्रयत्न केला तरी, ते अंग ओले असल्याने पुन्हा घसरुन पाण्यात पडतात. पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने दम लागतो. त्यातून पाण्यात गटांगळ्या खात जीवाला मुकावे लागते. पूर्वी कालव्याच्या दोन्ही बाजूला माती, गवत, झुडपे असल्याने त्याला धरुन वर येता येत होते.

 

 

Web Title :-  Pune Crime | women went for morning walk drowned in a canal baramati of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा