Pune Crime | पुण्यात आयटी पार्कमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) भागात एका तरुणीचा मृतदेह (Girl Dead Body) लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी मुलीचा निर्घृण खून (Murder) केल्यानंतर तिचा मृतदेह झाडाला लटवकला असल्याचे प्राथमिक माहितीतून (Pune Crime) समोर आले आहे. या मुलीची अद्याप ओळख (Identity) पटलेली नाही.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील मुळा मुठा नदीच्या (Mula-Mutha River) काठावर एका निर्जनस्थळी हा मृतदेह आढळून आला. मयत मुलीचा चार ते पाच आठवड्यांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला असावा. त्यानंतर मुलीचा मृतदेह झाडाला लटकवला अशी माहिती (Information) प्राथमिक तपासात (Preliminary Investigation) समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदन आणि डीएनए टेस्स्टसाठी (DNA Test) सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Pimpri Chinchwad CP Krishna Prakash) यांनी सांगितले, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बेपत्ता लोकांची (Missing Persons) माहिती मिळणे आवश्यक आहे. जर एखादी मुलगी किंवा महिला बेपत्ता असेल तर तिच्या नातेवाईकांनी पुढे येऊन माहिती पोलिसांना द्यावी. यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्यात मदत होईल. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पुढील उलगडा होईल.

 

 

Web Title :- Pune Crime | young girl dead body hanged over tree in hinjewadi IT park area of pimpri chinchwad

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

RRR Box Office Collection | ‘RRR’ चित्रपटानं रचला नवा इतिहास ! प्रदर्शनाच्या 5 व्या दिवसाची कमाई ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क

 

Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) | पीएमआरडीएच्या 2 हजार 419 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी ! शिवाजीनगर-हिंजवडी ऐवजी माण-हिंजवडी-शिवाजीनगर असे मेट्रो मार्गिकेला नाव

 

MP Girish Bapat | ‘बिबवेवाडीतील ESIC रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलसोबतच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे’ – खासदार गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी