Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेतात जाणारी वाट आडवल्याच्या रागातून सख्ख्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा (Younger Brother) कुऱ्हाडीचा घाव घालून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील (Baramati Taluka) मोढवे गावात घडली आहे. ही घटना (Pune Crime) शुक्रवारी (दि.12) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत आरोपी लहान भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

तायाप्पा सोमा मोटे Tayappa Soma Mote (रा. मोढवे, मोटे वस्ती, ता. बारामती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तायाप्पाची सून लक्ष्मी महादेव मोटे Lakshmi Mahadev Mote (वय – 37 रा. मोढवे, मोटे वस्ती, ता. बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात (Vadgaon Nimbalkar Police Station) फिर्याद दिली आहे. तर रामा सोमा मोटे (Rama Soma Mote) हा जखमी झाला असून पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायाप्पा मोटे याने आरोपी धाकटा भाऊ रामाला तु शेतात जाणाऱ्या वाटेवर लाकडाचे ओंडके का टाकले अशी विचारणा केली.
त्या कारणावरुन दोघांमध्ये जोराचे भांडण झाले.
त्यावेळी रामा मोटे याने मोठा भाऊ तायाप्पा याला शिवीगाळ करुन दमदाटी करत तु या रस्त्याने जायचे नाही.
तुला आता जिवंत सोडणार नाही. तुला खल्लास करतो, असे म्हणून रामा मोटे याने तायाप्पा सोबत वाद घातला.

 

त्यावेळी रामा आणि तायाप्पा यांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने घाव घालण्यास सुरुवात केली.
रामाने तायाप्पा याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले. यामध्ये तायाप्पाचा जागीच मृत्यू झाला.
तर रामाच्या पायावर घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Ganesh Ingle),
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे (API Somnath Lande) यांनी घटनास्थळी भेट दिली.
दरम्यान आरोपी रामाच्या पायावर घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | younger brother killed elder brother with ax for blocking the road at modwe in baramati taluka of pune district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा