Pune Crime | तरुणाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न, सहकारनगर पोलिसांकडून आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तरुणाच्या अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न (Attempt to Burn Alive) केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.7) (Pune Crime) घडला होता. हा प्रकार रात्री दीडच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) येथील स्मशानभूमी आवारात घडला होता. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) एका आरोपी विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपीला 12 तासाच्या आत अटक केली.

 

सुरज विजय मरळ Suraj Vijay Maral (वय – 28 रा. जिवनधारानगर, धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गोविंदा उर्फ प्रेमकुमार यादव Govinda alias Premkumar Yadav ( वय – 33 रा. गुजर निंबाळकरवाडी, कात्रज – Katraj) याच्याविरुद्ध भादवी कलम 307,504 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज मरळ आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. आरोपी सध्या गुजरवाडी (Gujarwadi) येथे राहण्यास गेला आहे. फिर्यादी यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय (Clothes Selling Business) असून ते घरातून हा व्यवसाय करतात. रविवारी (दि.6) ते व्यवसायातील पैसे गोळा करत असताना रात्री दहाच्या सुमारास आरोपी त्यांना भेटला.

त्यानंतर दोघांनी एका ठिकाणी दारु पिली. त्यानंतर धनकवडी स्मशानभुमी या ठिकाणी जाऊन गप्पा मारत बसले होते. दारूच्या नशेत आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. तसेच जवळ पडलेला सिमेंटचा ब्लॉक (Cement Block) डोक्यात मारुन जखमी केले. तसेच सोबत आणलेले पेट्रोल आरोपीने फिर्यादीच्या अंगावर ओतून पेटवून देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

 

पोलीस आरोपीचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक बापु खेंगरे (PSI Bapu Khengare) व पोलीस अंमलदार सागर सुतकर (Sagar Sutkar) यांना माहिती मिळाली की, आरोपी केके मार्केट (KK Market) येथील एका गॅरेज जवळ मित्राला भेटण्यासाठी येणार आहे. तसेच तो त्याच्या मुळगावी बिहार (Bihar) येथे पळुन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग डॉ. राजेंद्र डहाळे (Addl CP Dr. Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे (API Umesh Londhe),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बापु खेंगरे, पोलीस अंमलदार बापु खुटवड, सोपान नावडकर, अमोल गुरव,
महादेव नाळे, भुजंग इंगळे, प्रदीप बेडीस्कर, सागर सुतकर, प्रविण कोकणे, शिवा खेड यांच्या पथकाने केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हयातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Pune Crime | Youth arrested by Sahakar Nagar Police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा