Pune : तडीपार काळातही शहरात येऊन घरफोडी करणाऱ्या सराईतास समर्थ पोलिसांनी 24 तासात केली अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – तडीपार काळात शहरात येऊन घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्याच्याकडून एक गुन्हा उघडकीस आणला आहे.

आकाश ऊर्फ झुरुळ्या विठ्ठल पाटोळे (रा. भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात142 नुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

व्यापारी सुरेश ओसवाल यांचे ड्रायफूटचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. त्यातील 40 हजार रुपये रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यावेळी कर्मचारी सुमीत खुट्टे व नीलेश साबळे यांना हा गुन्हा सराईत गुन्हेगार आकाश याने केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक विशाल मोहिते, कर्मचारी सुमीत खुट्टे व नीलेश साबळे, सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सचिन पवार, दत्ता सोनवणे याच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्यावेळी तडीपार कालावधीत शहरात आल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून घरफोडीत चोरीला गेलेली 40 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

आकाश ऊर्फ झुरुळ्या हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर घरफोडीचे 12 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, तडीपार काळातदेखील तो शहरात येऊन गुन्हे करत असल्याने पोलिसांच्या तडीपारीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.