Pune Cyber Crime News | स्क्रिन शेअरींग अ‍ॅप डाऊनलोड करणे पडले महागात, सायबर गुन्हेगारांकडून पुण्यातील महिलेला 11 लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सायबर गुन्हेगारांकडून (Pune Cyber Crime News) अनेकांना वेगवेगळ्या माध्यमातून गंडा (Cheating Case) घातला जात असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना पुण्यातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या महिलेसोबत घडली आहे. महिलेला स्क्रिन शेअरींग अ‍ॅप (Screen Sharing App) डाऊनलोड करण्यास सांगून महिलेच्या बँक खात्यातून 10 लाख 90 हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केली. हा प्रकार जुलै 23 ते शनिवार (दि.7) दरम्यान शिवाजीनगर येथील महिलेच्या घरी घडला आहे. (Pune Cyber Crime News)

याबाबत शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) शनिवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 8434192532 क्रमांकाच्या मोबाईल धारकावर आयपीसी 420, 34 सह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) बँक खात्याचे बँक स्टेटमेंट पाहिजे होते. बँक स्टेटमेंट निघत नसल्याने त्यांनी गुगलवर याबाबत सर्च केले. त्यावेळी त्यांना 8434192532 हा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता आरोपींनी रस्ट डेस्क अ‍ॅप नावाचे स्क्रिन शेअरींग अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड केले. (Pune Cyber Crime News)

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या मोबाईलवर ताबा मिळवून त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती घेतली.
सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 10 लाख 92 हजार 600 रुपये परस्पर कढून घेत फिर्य़ादी यांची फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

भोरच्या वरंधा घाटात मिनी बस 60 फूट खोल दरीत कोसळली, चालकाचा मृत्यू, 4 प्रवासी जखमी

पुण्यातील खडकी, लोणीकंद, चतु:श्रृंगी, कोंढवा परिसरात घरफोडी, सोने चांदीच्या दागिन्यांसह 12 लाखांचा ऐवज लंपास