Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

पुणे : Pune Cyber Crime News | गॅस संपल्यानंतर नवीन सिलेंडरला रेग्युलेटर अनेकदा बसत नाही. तेव्हा गॅस सिलेंडर वितरकाला फोन करतो, त्यांचा माणूस येऊन बसवून देतो. पण एका ज्येष्ठ नागरिक महिलेने एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर गुगलला सर्च केला. त्याने दिलेल्या सल्ल्यानुसार वागली आणि तब्बल ५ लाख ७३ हजार रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा (Fraud Case) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime News)

याप्रकरणी भांडारकर रोडवर राहणार्‍या एका ६४ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार ४ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता घडला. (Pune Cyber Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील गॅस सकाळी संपला. नवीन सिलेंडरला रेग्युलेटर बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुगलवर एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन त्यावर संपर्क केला. त्याला रेग्युलेटरबाबत सांगितल्याने त्याने मोबाईलवर क्वीक हेल्प अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यामध्ये त्यांना सर्व माहिती भरायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी बँकेसह सर्व माहिती भरली. त्यानंतर त्यांना त्या चोरट्याने २५ रुपये पाठविण्यास सांगितले. ते पैसे पाठविल्यावर तंत्रज्ञ येऊन तुम्हाला काम करुन देईन, काही पैसे असेल तर ते सांगेल, असे सायबर चोरट्याने सांगितले.

तेव्हा त्यांना अशा प्रकारे फसवणूक होत असल्याची लक्षात आले.
त्याने हिंदीतूनच त्यांना अशी फसवणूक होत असल्याची आम्हाला माहिती आहे.
तुम्हाला एच पीची २५ रुपयांची पावती मिळेल, असे सांगितल्यावर त्यांनी त्यांनी एकीकडे फोनवर बोलत
असतानाच २५ रुपये ट्रान्सफर केले. त्या पाठोपाठ त्यांच्या मोबाईलवर एका पाठोपाठ मेसेज येण्यास सुरुवात झाली.
त्यांनी ते पाहिल्यावर आपली फसवणुक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तातडीने बँकेला फोन करुन बँक खाते गोठविण्यास सांगितले.
तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ५ लाख ७३ हजार ८०७ रुपये काढून घेत संपूर्ण खाते रिकामे केले होते.
पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Cyber Crime News | Gas regulator doesn’t fit, 6 lakhs to consult customer care on Google, senior woman cheated by cyber thieves

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

KL Rahul-Athiya Shetty Wedding | लग्नाची तारीख विचारताच अथिया शेट्टीने दिली हि रिअ‍ॅक्शन; Video व्हायरल

PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…