Pune Cyber Crime News | पुणे : तपास यंत्रणांची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची 2 कोटींची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Cyber Crime News | विमानतळावर परदेशातून पाठवलेल्या पाकिटामध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर चोरट्यांनी कोरेगाव पार्क (Koregaon Park) भागातील एका 69 वर्षीय ज्येष्ठ महिलेची दोन कोटी 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचे समोर आले आहे. याबाबत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station Pune) फिर्याद दिली आहे. हा प्रकार 26 एप्रिल 2024 ते 6 मे 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिल रोजी ज्येष्ठ महिलेच्या मोबाईलवर क्रमांकावर सायबर गुन्हेगाराने संपर्क साधला. फेडेक्स कुरिअर कंपनीच्या कार्यलयातून आकाश कुमार बोलत असल्याचे सांगितले. मुंबई विमानतळावर फेडेक्स कुरिअर कंपनीकडून पाठविण्यात आलेले पाकीट सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे. पाकिटात अंमली पदार्थ सापडले असून याप्रकरणी मुंबईतील अंमली पदार्थ विभागात (NCB) गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई टाळायची असेल तर एक अॅप डाऊनलोड करा, असे सायबर चोरट्यांनी सांगितले. (Pune Cyber ​​Crime News)

बँक खात्याची माहिती चोरट्याने घेतली.
बँक खात्याची माहिती पडताळण्यासाठी तुमच्या खात्यातील सर्व पैसे माझ्या खात्यात पाठवा,
अशी बतावणी सायबर गुन्हेगाराने केली.
चोरट्यांच्या सांगण्यावरु महिलेने चोरट्याच्या खात्यात दोन कोटी 80 हजार रुपये जमा केले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील तपास करीत आहेत. (Pune Cyber ​​Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा, आढळरावांनाही दिले आव्हान, ”स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा…”

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी