Pune Dahi Handi | नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर आयोजित तृतीयपंथीच्या दहीहंडीला पुणेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद (Video)

तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन – दीपक मानकर

पुणे : Pune Dahi Handi | दरवर्षी प्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. तर पुणे शहरातील विविध मंडळीनी गोकुळाष्टमी साजरी केली. तर यंदा प्रथमच पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर तृतीयपंथी यांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही दहीहंडी पाहण्यास शहरातील अनेक भागातून नागरिक आले होते. प्रथमच तृतीयपंथी यांची दहीहंडी असल्याने प्रत्येक नागरिक त्यांना प्रोत्साहित करित होता. (Pune Dahi Handi)

‘दीपस्तंभ’चे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar), सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमांतून तृतीयपंथी यांच्या दहीहंडीचे विशेष आयोजन करण्यात आले होते.पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील 100 जणांचे चार संघ तयार करण्यात आले होते.तर या स्पर्धेत मंगलमुखी ट्रस्ट संघ, पिंपरी चिंचवड साक्षी, पुणे महानगरपालिका रनरागिणी, पुणे महानगरपालिका आयुशी हे चार तृतीयपंथी यांचे संघ सहभागी झाले होते.या चार ही संघांना प्रत्येकी 25 हजार, स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरविण्यात आले. (Pune Dahi Handi)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले की, तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला असून आता आगामी काळात तृतीयपंथी यांना हक्काच्या घर मिळून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार याच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले.

या दहीहंडीमध्ये सहभागी तृतीयपंथी स्पर्धक तन्वी भोसले म्हणाल्या की,
मी पुणे महापालिकेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करते.पण कामामुळे छंद जोपासणे अवघड होते.
पण मागील आठ दिवसापासुन आम्ही सर्वांनी दहीहंडीचा सराव केला.
त्यामुळे आज आम्ही सहभागी होऊ शकलो आहे.त्याबद्दल मी आणि माझे सहकारी आनंदी आहोत,
यापुढील काळात देखील समाजाने आमच्या करीता अशा कार्यक्रमाचे आयोजन करून
आमची कला सादर करण्याची संधी द्यावी अशी मागणी आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Rashmi Shukla | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दिलासा! फोन टॅपिंग प्रकरणातील 2 FIR वर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय