पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ४५ पाकिस्तानींना भारतीय नागरिकत्व

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक वर्षांपासून व्हिसावर पुण्यात राहात असलेल्या ४५ पाकिस्तानी नागरिकांना पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भारताचे नागरिकत्व बहाल केले आहे. फाळणीनंतर अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये हाल सोसणारे सिंधी बांधव मागील काही वर्षांपासून पुण्यात व्हिसावर राहात होते. तेथील जाचातून सुटका करण्यासाठी ते भारतात आले होते. आता भारतीय नागरिकत्व मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता.

भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानातील सिंध प्रांतात काही सिंधी बांधव राहत होते. फाळणीनंतर तेथे होणाऱ्या त्रासाला कंटाळून या सिंधी बांधवांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. ते भारतात आले. मागील काही वर्षांपासून पुण्यात व्हिसावर त्यांचे वास्तव्य होते. भारतीय नागरिकत्व नसल्याने त्यांना भारतात शिक्षण, आणि इतर सरकारी कामांसाठी त्यांना पाकिस्तानी नागरिकत्वाचा अडसर येत होता. त्यामुळे त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. एकूण ९० सिंधी बांधवांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे यासाठी अर्ज केला होता.

पाकिस्तान, बांग्लादेश, अफगानिस्तान या देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्वाचे अधिकार यापुर्वी केंद्राला होते. परंतु आता ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून त्यांचे कागदपत्र आयबीकडे अडकले होते. पंरतु मागील दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या कामाकाजानंतर त्यांना नागरिकत्व देण्यात आले. तसेच त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता झाल्याची खात्री करून नागरिकत्वाचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.