Pune Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh | पुणे जिल्हा सहकारी दूध संघाची कात्रज मस्तानी, कात्रज कुल्फी आणि टेट्रा पॅक दूध लवकरच उपलब्ध होणार

संघाचे संचालक भगवान पासलकर यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh | विक्रीची किंमत न वाढवता शेतकर्‍यांना दुधाचे अधिक दर देतानाच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दुग्धजन्य पदार्थांची संख्या आणि विक्री वाढवत संघ फायद्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दुग्धजन्य पदार्थांची संख्या वाढवताना नव्याने कात्रज मस्तानी (Katraj Mastani) तसेच तीन फ्लेवरमधील कात्रज कुल्फी (Katraj Kulfi) देखिल बाजारात आणली आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर (Bhagwan Pasalkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh)

याप्रसंगी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक तसेच संघाचे व्यवस्थापकीय संचालकही उपस्थित होते. पासलकर यांनी सांगितले, की संघाने वर्षभरात शेतकर्‍यांना गायी आणि म्हशीच्या दूधाला ९ रुपये अधिक दर दिला आहे. मात्र विक्रीचा दर वाढविण्यात आलेला नाही. वर्षभरात दररोजचे दूध संकलनही २ लाख लिटरच्या पुढे गेले आहे. संघाने आत्तापर्यंत खाजगी व संघ बल्क कुलर्स मिळून एकुण १४७ बल्क कुलर्स बसविले आहेत. बल्क कुलर्स द्वारे संघास चांगल्या गुणप्रतीच्या दूधाचा पुरवठा होत आहे. (Pune Jilha Sahakari Dudh Utpadak Sangh)

संघाने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री वाढविणेसाठी पुणे, पिंपरी चिंचवड शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील मिल्क पार्लर्स सुरु केलेली आहेत. संघाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीत देखील वाढ झालेली असून सुरु संघाने पेण, पनवेल, नवी मुंबई, वसई तसेच सिन्नर, नाशिक या ठिकाणी मिल्क पार्लर्स केलेली आहेत. तसेच पुणे-सोलापुर-अक्कलकोट, पुणे-सातारा-महाबळेश्वर आणि अहमदनगर सुपा हे दूधवितरण मार्ग चालू आहेत. सातारा, सांगली, कोल्हापुर या ठिकाणी वितरक नेमणुक केलेली आहे.

बारामती हा नविन दूधवितरण मार्ग चालू केलेला आहे. येरवडा जेल, ससुन हॉस्पिटल इ. शासकिय आस्थापनांना दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा सुरु केलेला आहे. सन २०२२-२३ मध्ये नव्याने एकूण १३४ आधुनिक पद्धतीचे मिल्क व आईस्क्रीम पार्लर सुरु करण्यात आलेली आहेत. संघामार्फत एनडीए खडकवासला, एएससी सप्लाय डेपो पुणे कॅम्प, एएससी सप्लाय डेपो खडकी मिलीट गिरीनगर या मिलिटरी युनिट येथे दूध, टेबल बटर तसेच पाश्चराईज्ड क्रिमचा पुरवठा केला जात आहे.

मागील आर्थिक वर्षात संघाची उलाढाल ३५० कोटी रुपयांच्या आसपास झाली असून दुग्धजन्य पदार्थांची विक्री सरासरी रु. ८० कोटी झालेली आहे. या आर्थिक वर्षात संघास रु. ५१ लाख निव्वळ नफा झालेला आहे.
कोंढापुरी येथे उभारण्यात आलेल्या पशुखाद्य कारखान्याचे कामकाज पूर्ण झालेले असून पशुखाद्य विक्री सुरू
करण्यात आलेली आहे. पशुखाद्य विक्रीत वाढ होण्यासाठी पशुखाद्य मार्केटिंगवर जास्त भर दिला जात आहे. ओतूर दूध शितकरण येथे जनावरांच्या उपचारसाठी ईथिनो व्हिटरनरी मेडिसीन प्रकल्प उभारणीचा संघाचा मानस आहे. पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या जनावरांसाठी इनपूट सुविधा तसेच पशुखाद्य विक्री वाढविणेसाठी प्रत्येक तालुक्यात पशुधन पर्यवेक्षक नेमणेत आलेले आहेत. संघाचे अवसरी दूध शितकरण केंद्र येथे बायोगॅस व सेंद्रिय खत प्रकल्प उभारण्यात आलेला आहे.

कात्रज मलई कुल्फी, मँगो कुल्फी, ड्रायफ्रुटस कुल्फी या तीन फ्लेवर्स मध्ये कात्रज कुल्फीचे लॉचिंग करणार आहोत.
तसेच लवकरच कात्रज मस्तानी व कात्रज टेट्रा पॅक दूध लॉंचिंग करण्यात येत असल्याचे पासलकर यांनी नमूद केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या ऐवजी
बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे; प्रकल्प राबविल्यास
मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी. पर्यायी रस्ता तयार होणार !

ACB Trap Case | 35 हजार रुपये लाच घेताना जिल्हा जात पडताळणी समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Pragya Thakur-SPL NIA Court | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर
यांच्यासह सहा आरोपी एनआयए कोर्टात हजर