MP Pragya Thakur-SPL NIA Court | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सहा आरोपी एनआयए कोर्टात हजर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MP Pragya Thakur-SPL NIA Court | महाराष्ट्रातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या (Malegaon Blast Case) सुनावणीदरम्यान सोमवारी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सहा आरोपी एनआयए विशेष न्यायालयात हजर झाले. (MP Pragya Thakur-SPL NIA Court)

न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच पुढील सुनावणीवेळी सर्व आरोपींना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (MP Pragya Thakur-SPL NIA Court)

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीसाठी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर दुपारी २ च्या सुमारास न्यायालयात पोहोचल्या. त्या उशीरा येण्याचे कारण आरोग्य समस्या असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाने त्यांचा जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.

प्रज्ञा ठाकूर यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी सोमवारी न्यायालयात हजर झाले. सुधाकर द्विवेदी आज न्यायालयात हजर झाले नाहीत. पूजाविधी असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आणि सूट मागितली. न्यायालयाने सूट देण्याची मागणी फेटाळून लावली आणि द्विवेदी यांच्याविरुद्ध ५,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले.

उत्तर महाराष्ट्रात २९ सप्टेंबर २००८ रोजी मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव शहरातील मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट होऊन ६ जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केला होता. त्यानंतर २०११ मध्ये हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आले. सध्या एनआयएच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | 35 हजार रुपये लाच घेताना जिल्हा जात पडताळणी समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Khadakwasla To Phursungi Water Tunnel | खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्या ऐवजी
बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजनेत एक पाउल पुढे;
प्रकल्प राबविल्यास मुठा उजव्या कालव्यावर २७ कि.मी. पर्यायी रस्ता तयार होणार !