Pune Division Deputy Collectors Transfer | पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Division Deputy Collectors Transfer | राज्य महसूल आणि वन विभागाचे उपसचिव माधव वीर ( Madhav Veer) यांनी शुक्रवारी रात्री पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी (RDC) हिम्मत खराडे यांची तर हवेली उपविभागीय अधिकारीपदी म्हणजेच प्रांताधिकारी पदी संजय आसवले यांची नियुक्ती केली आहे. या दोघांसह पुणे विभागातील तब्बल 16 उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या (Pune Division Deputy Collectors Transfer)
बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.

Pune Crime | पुण्यातील हॉस्पिटलमधून डोळे तपासणी मशीन चोरी करणारी ‘दुकली’ गजाआड

पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची अंधेरी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्यातील संजय आसवले यांची हवेली उपविभागीय अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन बारावकर यांच्या बदलीने हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते. पंढरपूरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून गजानन गुरव (Gajanan Gurav) यांची नियुक्ती झाली आहे. सचिन ढोले (Sachin Dhole) यांच्या बदलीमुळे हे पदही रिक्त होते. गुरव यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले होते. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी (Vitthal Joshi) यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत संपवण्यात आली असून त्यांची निवासी उपजिल्हाधिकारी (भंडारा) येथे बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी शंकर जाधव (Deputy Collector) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कोठून कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे —

हिम्मत खराडे (नोंदणी उपमहानिरीक्षक ते निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे)

संजय आसवले (भूसंपादन अधिकारी, सातारा ते उपविभागीय अधिकारी, हवेली)

गजानन गुरव (उपजिल्हाधिकारी, सोलापूर ते उपविभागीय अधिकारी, पंढरपूर)

भाऊ गलांडे (निवासी उपजिल्हाधिकारी ते उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, पुणे)

प्रशांत आवटे (उपविभागीय अधिकारी ते उपजिल्हाधिकारी, महसूल, सातारा)

किरण मुसळे-कुलकर्णी (उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना ते उपजिल्हाधिकारी भूसंपादन, सांगली)

शंकरराव जाधव (उपजिल्हाधिकारी ते सांगली निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर)

वसुंधरा बारवे (जिल्हा पुरवठा अधिकारी, सांगली ते उपविभागीय अधिकारी, भुदरगड)

अप्पासाहेब समिंदर (अन्नधान्य वितरण अधिकारी ते उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा)

उदयसिंह भोसले (उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा ते उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, उस्मानाबाद)

जयश्री कटारे (निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे ते मुद्रांक जिल्हाधिकारी, अंधेरी, मुंबई)

विजया यादव (उपजिल्हाधिकारी, सांगली ते उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी, सातारा)

मोहिनी चव्हाण (जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सोलापूर ते उपजिल्हाधिकारी महसूल, सांगली)

श्रीरंग तांबे (उपविभागीय अधिकारी, पाटण ते जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोलापूर)

सुनील गाढे (भूसंपादन अधिकारी, पुणे ते उपविभागीय अधिकारी, पाटण)

हे देखील वाचा

Pune News | पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची बदली ! RDC पदी हिम्मत खराडे तर हवेलीच्या प्रांत अधिकारीपदी संजय आसवले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Division Deputy Collectors Transfer | Transfers of 16 Deputy Collector level officers from Pune, Satara, Sangli, Solapur and Kolhapur districts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update