पुण्यात भल्या सकाळी दूध व्यावसायिकावर कोयत्याने सपासप वार ; गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – औंध येथील कस्तुरबा वसाहतीत दुध घालण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. रोहित अशोक जुनवणे (वय २८, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) असे त्याचे नाव आहे. एका सराईत गुन्हेगाराने हा हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांना मिळत असून रोहित याची दोन्ही हाताची बोटे छाटली गेली आहेत. त्याच्या डोक्यावर १० ते १२ वार करण्यात आले असून तो बेशुद्ध आहे.

पुणे | गोळीबार रुपेश पाटीलच्या साथीदाराने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जुनवणे हा दुध घालण्याचे काम करतो. नेहमीप्रमाणे तो दुध घालत असताना काही कारणावरुन त्याच्यावर धारधार शस्त्राने त्याच्या डोक्यात सपासप वार करण्यात आले. हा प्रकार सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान कस्तुरबा वसाहतीत घडला. काही नागरिकांनी रोहित रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे पाहिल्यानंतर पोलिसांना कळविले. त्याला तातडीने जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे व त्यांचे सहकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलला भेट दिली आहे.

पुण्यात भल्या सकाळी दूध व्यावसायिकाचा कोयत्याने सपासप वार करून खुन