Pune : पुण्यात 3.60 लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पोलिस अधिकार्‍यावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कर्तव्यास असलेल्या उपनिरीक्षकाने तबल 3 लाख 60 हजार रुपयांची लाच मगितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

उपनिरीक्षक चित्ते असे गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा वाहतूक विभागात चित्ते नेमणुकीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांना वाहतूक विभागाची ऐनओसी देण्यासाठी त्यांनी तीन लाख 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे लाचेची तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज एसीबीने उपनिरीक्षकावर लाच मगितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एसीबीचे पथक करत आहे. दरम्यान वाहतूक विभागातील सुरू असलेला अनागोंदी कारभार या प्रकाराने समोर आला असून, यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

आरोपी लोकसेवक :- बसवराज धोंडोंपा चित्ते
पद- पोलीस उप निरीक्षक, नेमणूक – वाहतुक विभाग येरवडा,
गुन्हा दाखल दिनांक:-12/05/2021
येरवडा पोलिस ठाणे , पुणे शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 253 /2021 भ्र.प्र.का.क.7 प्रमाणे.
लाचेची मागणी 3,60,000/- हकीकत :- यातील फिर्यादी यांना जाहिरात फलक लावण्याकरीता ना हरकत दाखला देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी 3,60,000/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.