पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire News | विमाननगर भागातील रोहन मिथिला इमारतीच्या (Rohan Mithila Building) परिसरात बांधकाम मजुरांच्या वसाहतीत आज (बुधवारी) दुपारी आग लागली. या आगीत (Pune Fire News) तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या घरात ठेवलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे स्फोट (Gas Cylinder Blast) झाले. या ठिकाणी एकूण 100 सिलिंडर होते. त्यापैकी 10 सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) अधिकाऱ्यांनी दिली.
विमाननगर (Viman Nagar) भागातील सिंबायोसिस कॉलेज जवळ (Symbiosis College) रोहन मिथिला इमारत आहे.
या परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरु असून त्याठिकाणी मजुर राहतात. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास
बांधकाम मजुरांच्या वसाहतीत आग (Pune Fire News) लागली. आग लागल्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. लेबर कॅम्प मध्ये राहणारे महिला व मुले बाहेर पळाल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र आगीत बांधकाम मजुरांच्या गृहोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून
आग आटोक्यात आणली. वसाहतीतील छोट्या घरात जवळपास 100 सिलिंडर ठेवण्यात आले होते.
त्यापैकी दहा सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा