Pune : मित्राच्या पत्नीचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राला उसने दिलेले पाच लाख रुपये परत मागितल्याचा राग आल्याने त्याने पत्नीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर भागात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार लॅबर्ट मार्टिन फर्नांडिस याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी यांचे पती यांच्यात मैत्री आहे. फिर्यादी यांनी पतीच्या सांगण्यावरून त्याला पाच लाख रुपये हात उसने दिले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हे पैसे दिले. त्यामुळे आता फिर्यादी या गेल्या काही दिवसांपासून पैसे परत मागत होत्या. मात्र, तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे फिर्यादी या रविवारी आरोपी राहत असलेल्या इमारतीत आल्या व त्याच्याकडे पैसे मागितले.

आरोपीने “आता माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही बिल्डिंग मध्ये काही बोलू नका, माझी दुसरी कडे रूम आहे आपण तिथे जाऊन बोलू” असे म्हणून फिर्यादीचा हा ओढला आणि फिर्यादी सोबत अश्लील चाळे देखील केले. अधिक बीजघशिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.