Pune Ganeshotsav 2023 | पुणे: मानाच्या पाच गणपतींची किती वाजता होणार प्राणप्रतिष्ठापना?, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2023 | लाडक्या गणपतीचे आगमन मंगळवारी (दि.19) रोजी होणार असून काही तास शिल्लक राहिले आहेत. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना (Pratishthapana) करण्यात येते. गणेश मंडळ आणि घरगुती बाप्पांच्या आगमनाची तयारी जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातीन मानाच्या पाच गणपती (Manache Ganpati In Pune ) पैकी पाचवा केसरीवाडी गणपतीचे टिळक पंचांगानुसार 19 ऑगस्ट रोजी आगमन झाले आहे. तर उर्वरीत मानाच्या गणपतींची प्रतिष्ठापना मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत होणार आहे. जाणून घ्या कोणत्या गणपतीची किती वाजता प्रतिष्ठापना होणार (Pune Ganeshotsav 2023)

मानाचा पहिला कसबा गणपती (Kasba Ganpati)

पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी होणार आहे. यंदाचे 131 वे वर्ष असून यावर्षी श्री मोरगावचा गणपतीचा देखावा साकारण्यात आला आहे. श्रीं ची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान होणार आहे. ही मूर्ती अभिजीत धोंडेफळे यांनी साकारली असून के.एम. रुग्णालय, अपोलो टॉकीज आणि फडके हौद चौक असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहेत. या मिरवणुकीत 80 वर्षापासून प्रभात ब्रास बॅण्ड सेवा देत असून यंदाही ही सेवा राहणार आहे. त्यांच्या साथीला संघर्ष, श्रीराम ढोल ताशा पथक असणार आहे. सकाळी 11 वाजून 37 मिनिटांनी अर्थगीमठाचे मठाधी अण्णा महाराज यांच्या हस्ते श्री प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावर्षी सुवर्ण जडित मुकुट अर्पण केला जाणार आहे. या मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आहेत. (Ganesha Chaturthi 2023)

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती (Tambdi Jogeshwari Ganpati)

श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यांदाचे 131 वे वर्ष आहे. श्रीं च्या आगमनाची मिरवणूक पारंपारिक पद्धतीने सकाळी 9.30 वाजता नारायण पेठेतील न.चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज (गुंळुंजकर यांच्या घरापासून) निघणार आहे. ही मिरवणूक कुंटे चौक, नगरकर तालीम, अप्पा बळवंत चौक मार्गे उत्सव मंडपात पोहोचेल. मिरवणुकीमध्ये आढाव बंधूंचे नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँड, शिवमुद्रा ढोलताशा पथक, ताल पथक, विष्णूनाद शंख पथक असणार आहे. दुपारी 11.50 वाजता श्री भूषण महारुद्र स्वामी महाराज, सज्जनगड सातार (श्री समर्थ घराण्याचे 11 वे वंशज) यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. उत्सव मंडपामध्ये श्री गणेश मंदिर साकारण्यात आले असून श्री मुग्दल पुराणातील श्री गणेशाच्या विविध अवतारांमधील पाच वेगवेगळी वाहने शेषनाग, सिंह, नंदी, मोर, घोडा श्रींसाठी करणार आहेत. दोन दिवसांनी वाहन बदलण्यात येणार आहे. प्रशांत टिकार हे मंडळाचे विश्वस्त आहेत.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती (Guruji Talim Ganpati)

Advt.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचे यंदाचे 137 वे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. गणपतीची मिरवणुक फुलांच्या आरासमधून निघणार असून मिरवणूक गुरुजी तालीम मंदिर, गणपती चौक, लिंबराज महाराज चौक, आप्पा बळवंत चौक, जोगेश्वरी चौक, बुधवार चौक, बेलबाग चौक मार्गे उत्सव मंडपात येईल. या मिरवणुकीमध्ये अभेद्य, गुरुजी प्रतिष्ठान आणि शिवप्रताप हे तीन ढोल ताशा पथक असणार आहेत. पुण्यातील उद्योगपती पुनीत बालन आणि जानव्ही पुनीत बालन यांच्या हस्ते 1 वाजून 45 मिनिटांनी प्रतिष्ठापना होणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भावीकाला बालाजी मंदिराप्रमाणेच लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे. या मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज परदेशी आहेत.

मानाचा चौथा तुळशीबाग गणपती (Tulshibaug Ganpati)

पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती. या मंडळाच्या बाप्पांची मिरवणूक सकाळी 10 वाजता राम मंदिर येथून पालखीमधून निघणार आहे. ही मिरवणूक बाबू गेनू चौक, जिलब्या मारुती चौक, शनिपार चौक येथून गणपती चौकातून उत्सव मंडपात येणार आहे. पुणे मर्चंटचे अध्यक्ष राजेंद्र बाटिया आणि उद्योजक राजेश शाह यांच्या हस्ते सकाळी 11.30 वाजता प्रतिष्ठापना होणार आहे. यांदाच्या वर्षी मंडळाने उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारला आहे. बाप्पाला सोन्याचे दात आणि जानवे भाविक अर्पण करणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष विशाल पवार आहेत.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती (Kesari Wada Ganpati)

मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव टिळक पंचांग नुसार आजपर्यंत साजरा केला जातो. त्यानुसार 20 ऑगस्ट 2023 रोजी केसरीवाडा येथे ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन झाले आहे. मात्र आपल्या इतर दिनदर्शिकेनुसार 19 सप्टेंबर 2023 रोजी गणपतीची सर्वत्र प्रतिष्ठापना केली जाणार आहे. मात्र, केसरीवाड्यात बाप्पांची 20 ऑगस्ट पासून नियमित पूजाअर्चा आणि कार्यक्रम होत आहेत. या मंडळाचे विश्वस्त रोहित टिळक आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत