Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत

मुंबई : Sadabhau Khot | राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्याबाहेर उस नेण्यास बंदी आदेश काढल्यानंतर शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात मोर्चा काढल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सरकारला इशारा दिला आहे. या बंदी आदेशामागे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असल्याचे खोत यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.

सदाभाऊ खोत यांनी म्हटले की, पुण्याचे साखर आयुक्त कार्यालय हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणारे कोठार आहे, त्याला आम्ही आग लावू, यावर्षी शेतकऱ्याच्या उसाला सोन्याचा भाव मिळणार आहे पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायला लागला की सरकारच्या पोटात दुखते. (Sadabhau Khot)

ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या उसाला या वर्षी सोन्याचा भाव मिळणार असताना सरकारला मात्र शेतकऱ्याचा उस भंगाराच्या भावात खरेदी करायचा आहे. यासाठीच सहकार विभागाने आणि सरकारने शेतकऱ्यांना बाहेरच्या राज्यात उस देण्यावर मनाई केली आहे. शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे. आमच्या बापाने आणि आम्ही पिकवलेला उस साखर कारखान्यांना द्यायचा की, कर्नाटकला द्यायचा की, गुजरातला द्यायचा हा आमचा अधिकार आहे. पण दोन पैसे शेतकऱ्याला मिळायला लागले की सरकारच्या पोटात दुखते.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की राष्ट्रवादीच्या वळू बैलांना शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका,
नाहीतर या वळू बैलांना ठेचून काढल्याशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी राहणार नाही.
आम्ही कर्नाटकमध्ये वाजत गाजत उस घेऊन जाऊ.

सदाभाऊंचा निशाणा कोणावर?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसह एकुण नऊ जणांनी भाजपा सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
अजित पवार उपमुख्यमंत्री तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते देण्यात आले आहे.

राज्याबाहेर उस नेण्यास बंदी घातल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी देखील आक्रमक झाले आहेत.
त्यांनी सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चा काढला होता. ज्या राज्यात आम्हाला चांगला दर मिळेल
त्या राज्यात आम्ही उस घेऊन जाऊ, असे आव्हान शेट्टी यांनी राज्य सरकारला दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Lok Sabha Elections 2024 | अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीची तयारी करण्याची सूचना