Pune Ganeshotsav 2023- Fire Brigade | पुणे शहरात गणपती उत्सवानिमित्त अग्निशमन दल घेणार “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” आढावा; मंडंळाना नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2023- Fire Brigade | यावर्षी पहिल्यांदाच पुणे अग्निशमन दल (PUNE FIRE BRIGADE) व फायर अँन्ड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (FSAI) यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील गणेशोत्सवाच्या काळात गणपती मंडळांनी आपले मंडळ आगीपासून सुरक्षित कसे आहे व त्याकरिता मंडळे काय उपाययोजना करतात याबाबत “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” म्हणून एक स्पर्धा घेण्याचे ठरविले असून त्यामागचे उदिष्ट असे की, गणेशोत्सवाच्या काळात शक्यतो मंडळाच्या ठिकाणी कुठेही आग वा अपघात घडू नये याबाबत जागरूक राहून येणारे असंख्य भाविक यांची ही सुरक्षितता कायम राहावी. त्याबाबत सार्वजनिक मंडळांनी नोंदणी (GOOGLE FORM) करण्याचे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे (Chief of Fire Brigade Devendra Potfode) यांनी केले आहे. (Pune Ganeshotsav 2023- Fire Brigade)

https://forms.gle/RJ3nDrUBukAsFVkHA

अग्निशमन दल व एफएसएआय संयुक्तरित्या पुढाकार घेऊन शहरात आग व अपघातापासून मंडळे सुरक्षित कशी राहावीत आणि जनमानसात याबाबत जागृती व्हावी या दृष्टीकोनातून हि संकल्पना साकारली आहे. मंडळांनी नोंदणीच्या करतेवेळी दिलेल्या अर्जामधे माहिती भरुन दिल्यावर त्याची छाननी होऊन अग्निशमन दलाकडील अग्निशमन अधिकारी आणि एफएसएआय संस्थेचे सदस्य हे प्रत्यक्ष मंडळांना भेटी देऊन पाहणी करतील व त्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असे बक्षीस जाहिर केले जाईल. तरी शहरातील जास्तीत जास्त मंडळाने सहभाग घ्यावा यासाठी आवाहन केले जात आहे. (Pune Ganeshotsav 2023- Fire Brigade)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis On Sunil Kendrekars Farmer Suicides Reports | शेतकरी आत्महत्यांबद्दल
केंद्रेकर यांच्या अहवालावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘त्यांची सामिती…’

Ganeshotsav 2023 | मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन –
पर्यटन मंत्री गिरीश महाजन

Ajit Pawar On Maharashtra Govt Ministers | अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावले खडेबोल,
कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती…