Pune Ganeshotsav 2023 | पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक 28 तास 40 मिनिटांनी संपली, गेल्यावर्षीच्या तुलनेत लवकर सांगता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Ganeshotsav 2023 | दहा दिवस लाडक्या गणरायाची सेवा केल्यानंतर गुरुवारी (दि.28) पुणेकरांनी गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात निरोप दिला. पुण्याचे ग्रामदैव आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने पालखीमधून काल सकाळी 10.30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर शुक्रवारी (दि.29) दुपारी 3.10 वाजता अखेरचा महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती अलका टॉकीज चौकातून पुढे मार्गस्थ झाला. त्यानंतर प्रशासनाने विसर्जन मिरवणुक संपल्याचे घोषीत केले. यंदाची मिरवणूक 28 तास 40 मिनिटे चालली. गणपती विसर्जन मिरवणूक निर्विघ्न आणि शांततेत पाडल्याने पुणे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. (Pune Ganeshotsav 2023)

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी 28 तासांहून थोडी जास्त काळ यंदाची विसर्जन मिरवणूक चालली. गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सुरु झालेली मिरवणूक आज (शुक्रवार) दुपारी तीनच्या सुमारास संपली.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची गणेश विसर्जन मिरवणूकीची सांगता अडीच तास लवकर झाली. गेल्यावर्षी मिरवणूक संपण्यासाठी 31 तास लागले होते. यंदा ही मिरवणूक 28 तास 40 मिनिटे चालली. अखेरचा गणपती अलका टॉकीज चौकातून पुढे गेल्यानंतर प्रशासनाने मिरवणूक संपल्याचे घोषित केले. पुण्यातील मिरवणूक शांततेत पार पाडावी हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असतं.

मागील काही वर्षांत मिरवणुकीसाठी लागलेला कालावधी

2016 – 28 तास 30 मिनिटं
2017 – 28 तास 05 मिनिटं
2018 – 27 तास 15 मिनिटं
2019 – 24 तास
2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे मिरवणुक निघाली नाही
2022 – 31 तास
2023 – 28 तास 40 मिनिटं

मानाच्या गणपतीच्या विसर्जनाची वेळ

  1. मानाचा पहिला कसबा गणपती – 10.30 वाजता मिरवणूक सुरू तर 4.10 वाजता विसर्जन झाले.
  2. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती – 11 वाजता मिरवणूक सुरू 4.43 वाजाता विसर्जन झाले.
  3. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती – 12 वाजता मिरवणूक सुरू आणि 5.40 वाजता विसर्जन झाले.
  4. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती – 1 वाजता मिरवणूक सुरू तर 6.32 वाजता विसर्जन झाले.
  5. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती – 2.15 मिरवणूक सुरू तर 7.00 वा विसर्जन झाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे आयोजन