Pune Ganeshotsav | गणपती देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी, पुणे पोलिसांकडून गणेशभक्तांसाठी पार्किंगची सोय; जाणून घ्या पार्किंगची ठिकाणं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. पुण्यातील गणपतीचे देखावे पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त (Ganesha Devotees) येत असतात. तसेच गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) दिवशीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेत. या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी पुणे वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) महापालिका शाळा, खासगी शाळा, सार्वजनिक पार्किंग बाबतच्या (Vehicles Parking) ठिकाणांची माहिती आहे. तेथे नागरिकांना (Pune Ganeshotsav) आपली वाहने पार्क करण्याची पोलिसांकडून सोय करण्यात आली आहे.

 

4 ते 8 सप्टेंबर पार्किंगची ठिकाणे
पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या गणेश मंडळांचे देखावे (Pune Ganeshotsav) पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. पाचव्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पुण्यातील देखावे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना वाहनतळ, मिलेनियम प्लाझा वाहनतळ, लँडमार्क वाहनतळ, शिरोळे रस्ता, प्रो. यश एंटरप्रायजेस, सर्कस मैदान, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, टिळक पूल ते भिडे पूल नदीकिनारी, बालभवनसमोर, सारसबाग रस्ता ते बजाज पुतळा ते समस पुतळा चौक उजवी बाजू, गाडीतळ पुतळा ते कुंभार वेस चौक, हमालवाडा पार्किंग, गोगटे प्रशाला, एस.पी. कॉलेज, मंगला टॉकीज, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीईओपी मैदान, पुरम चौक ते हॉटेल विश्व, देसाई कॉलेज या ठिकाणी सोय करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन दिवसाची पार्किंग ठिकाण
गरवारे कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, काँग्रेस भवन, मनपा भवन पार्किंग, सीओईपी मैदान,
मंगला टॉकीज, हमालवाडा पार्किंग, जयंतराव टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्राचा रस्ता,
आयएलएस लॉ कॉलेज, संजीवनी हॉस्पिटल, जैन हॉस्टेल, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस,
फर्ग्युसन कॉलेज, आपटे प्रशाला, बीएमसीसी कॉलेज, पुरम चौक ते हॉटेल विश्व रस्त्याची डावी बाजू, न्यू इंग्लिश स्कूल.

 

Web Title :- Pune Ganeshotsav | parking facility for ganesha devotees coming to pune city to witness the scenes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PPF खातेधारकांसाठी भारतीय पोस्ट देत आहे मोठी सुविधा, घरबसल्या करू शकता हे काम

 

Aurangabad Crime | ‘बायकोला सोड अन् माझ्याशी लग्न कर’, प्रेयसीच्या तगाद्याला वैतागून विवाहित तरूणानं उचललं टोकाचं पाऊल

 

High Court | पत्नीची देखभाल करणे कायदेशीर प्रकारे पतीची जबाबदारी, HC ने फेटाळली याचिका