‘जन्म-मृत्यूचे दाखले तात्काळ द्या’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जन्म आणि मृत्यू चे दाखले वेळेवर मिळत नसल्याचं अनेक नागरिकांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच अधिक चौकशी केल्यानंतर आमच्या असे लक्षात आले की संबंधित कामासाठी जे कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर काम करत होते त्यांचे कॉन्ट्रॅक्ट संपलेले असून महापालिकेने त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू केलेले नाही असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात जेव्हा एकीकडे मृतांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे लोकांना कामाची गरज आहे अशावेळी महापालिकेने या कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने कर्मचाऱ्यांचे तर नुकसान होतच आहे शिवाय नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला मिळण्यासही त्रास होत आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक ठिकाणी मृत्यू दाखला जमा करावाच लागतो मग ते हॉस्पिटल असो, बँक असो, पेंशन ऑफिस असो, बिमा ऑफिस असो की इतर काही. अशा वेळेत जेव्हा महापालिकेने इतर अनेक टेंडर पास केले आहेत तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यासारखा अत्यंत महत्वाचा विषय स्थगित ठेवावा हे आश्चर्यचकित करण्यासारखे आहे असंही राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं सांगितलं आहे.

तेव्हा या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त डॉ. कल्पना बळीवंत यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही निवेदन दिले. उप निबंधक बेसरकर मॅडम यांनी हे निवेदन स्वीकार केले. आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे की लवकरात लवकर या समस्येचे समाधान करण्यात येईल व कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या कर्मचाऱ्यांचे टेंडर काढून व पास करून अशा कर्मचाऱ्यांना ही कामावर रुजू करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं दिली आहे.