Pune Hadapsar Accident News | भरधाव टेम्पोच्या धकडेत एकाचा मृत्यू, टेम्पो चालकाला अटक; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Accident News | भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो चालकाने ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून एका व्यक्तीला समोरुन धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे सोलापूर रोडवरील बीआरटी पीएमटी बस स्टॉप येथील सार्वजनिक रोडवर मंगळवारी (दि.20) रात्री नऊच्या सुमारास झाला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) टेम्पो चालकाला अटक केली आहे.

निरंजन पांडुरंग जाधव (वय-45 रा. शंकरमठ, आलकुंटे वस्ती, हडपसर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत केतन संतोष शिंदे (वय-20 रा. दत्त मंदिराच्या जवळ, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवाजी राजेंद्र झोंबाडे (वय-41) याच्यावर आयपीसी 304(अ), 279 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मित्र मृत निरंजन जाधव हे वैदवाडी येथील सार्वजनिक रोडवरुन जात होते.
त्यावेळी आरोपी त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (एमएच 14 ईएम 9833) भरधाव वेगात घेऊन जात होता.
आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो हयगयीने व निष्काळजीपणे चालवून, वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करुन निरंजन जाधव
यांना समोरुन धडक दिली. यामध्ये जाधव हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक बर्गे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?