BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

मुंबई : BJP MP Raksha Khadse | नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून बरेच लोकांचीही इच्छा आहे की, नाथाभाऊंनी भारतीय जनता पार्टीत येऊन पुन्हा कामाला सुरुवात करावी. यामुळे लोकांना आनंद होणार आहे. लोकांची इच्छा तीच माझी इच्छा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) यांनी व्यक्त केले आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे घरवापसी करणार अशी चर्चा आहे, त्यावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.

रक्षा खडसे म्हणाल्या, मागील अनेक दिवसांपासून हे चित्र आहे की, अन्य पक्षातील बडे नेते भाजपामध्ये येत आहेत. एकनाथ खडसे यांच्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही, कारण तो वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. पक्ष काय निर्णय घेतो, नाथाभाऊंचे त्यावर काय मत आहे, हे घडल्यानंतर सर्वांना समजेल, असेही सूतोवाच रक्षा खडसे यांनी केले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक आणि मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या घरवापसीबद्दल खोचक प्रतिक्रिया दिली आहे. महाजन म्हणाले, खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे कळले. मला वाटते तसे काही प्रयोजन नाही. अद्याप कोणी खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल मला विचारलेले नाही. कदाचित खडसे यांनी थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

‘आम्ही येथील भाई आहोत’, पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड, नऱ्हे परिसरातील प्रकार

‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी