Pune Hadapsar Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | शिववंदना संपवुन घराकडे जाणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करुन तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका युवकावर विनयभंग (Molestation Case) व पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास हडपसर ते फुरसुंगी (Fursungi) दरम्यान घडला.

याबाबत 14 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली. यावरुन संदीप नाना शिंदे Sandeep Nana Shinde (वय-32 रा. संकेत विहार, फुरसुंगी) याच्यावर आयपीसी 354 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पीडित मुलगी शिववंदना संपवुन घराकडे जात होते. त्यावेळी आरोपीने वाईट उद्देशाने त्याच्या दुचाकीवरुन फिर्यादीचा पाठलाग केला. तसेच विनाकारण बोलण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्य़ादत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. गोसावी (PSI SS Gosavi) करीत आहेत.(Pune Hadapsar Crime)

महिलेला हाताने मारहाण करुन कपडे फाडले

लोणी काळभोर : महिलेची साडी ओढून तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याची घटना लोणी काळभोर येथे
गुरुवारी (दि.21) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तानाजी मांडले व त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे पती आरोपीकडे विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ केली.

त्यावेळी आरोपीची पत्नी त्याठिकाणी आली. तिने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तर तानाजी याने महिलेची साडी ओढल्याने साडी फाटली. त्यावेळी महिला साडी व्यवस्थित करत असताना आरोपीने महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला. पुढील तापस पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sadashiv Peth Crime | एकमेकांकडे पाहून हसण्यावरून दोघांवर चाकूने वार, एम.आय.पी.टी कॉलेजमधील घटना

Baramati Lok Sabha Election 2024 | विजय शिवतारे यांचा बोलविता धनी कोण? अजित पवार समर्थक सावध

Pune Vidyapeeth Crime | राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन मारहाण, पुणे विद्यापीठातील घटना

Pimpri Traffic Updates | पिंपरी : तुकाराम बीजसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Lok Sabha | ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’ ! मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार (Video)