Pune Hormone Hub | पुण्यात भारतातील पहिल्या अभिनव हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस सेंटरचे उद्घाटन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hormone Hub | पाश्चिमात्य देशात हार्मोन रिप्लेसमेंट, थेरपी सेंटरचे प्रमाण मोठे आहे. पण भारतात आजही ठराविक उपचार वगळता इतर ग्रंथीच्या आजारांवर पारंपरिक पद्धतीनेच उपचार केले जातात. मात्र, काळाची गरज ओळखून आता पुण्यात भारतातील पहिल्या हार्मोन हब (हार्मोन रिप्लेसमेंट आणि वेलनेस क्लिनिक) चे (Hormone Replacement Therapy Center in Pune) उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) यांच्या हस्ते करण्यात आले. (Pune Hormone Hub)

 

याप्रसंगी हार्मोन वेलनेस क्लिनिक्स प्रा. लि. चे (Hormone Wellness Clinics Private Limited) व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश ब्राम्हणकर (Dr.Mahesh Brahmankar), डॉ विक्रम डोसी (संचालक) (Dr. Vikram Doshi), डॉ. सूरज कोडक (एम डी) संचालक Dr. Suraj Kodak (MD), डॉ नुपूर काळे – उमराणीकर (स्त्रीरोग तज्ञ) Dr. Nupoor Kale-Umranikar (Gynecologist), डॉ पियुष लोढा (डी एम एंडोक्रिनोलॉजी) Dr. Piyush Lodha – Endocrinologist, डॉ. मुकेश बुधवाणी (एम डी) फेलोशिप साइको-सेक्शुअल मेडिसिन Dr. Mukesh Budhwani, डॉ राकेश नेवे (ज्येष्ठ कर्करोग तज्ञ) (Dr Rakesh Neve), आहारतज्ञ डॉ अनूज गावंडे Dr. Anuj Gawande, हिंदुस्थानी क्लासिकल पंडीत पुष्कर लेले (Pushkar Lele) आणि म्यूजिक थेरपी तज्ञ डॉ शुभम कुलकर्णी (Dr. Shubham Kulkarni) आदी उपस्थित होते. (Pune Hormone Hub)

 

यावेळी बोलताना अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाल्या, हार्मोन रिप्लेसमेंट ही एक आधुनिक उपचार पद्धत आहे. या  बद्दल ऐकताना एखाद्या फिक्शन् फिल्म प्रमाणे वाटतय.  मात्र हार्मोन रिप्लेसमेंट ही एक परवडू शकेल अशी उपचार पद्धत आहे, यातून रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात, आणि यांचा सक्सेस रेट खूप चांगला आहे,  हे बघून या अभिनव उपक्रमाचा मी भाग झाले यांचा अतिशय आनंद वाटतो.

Advt.

हार्मोन हब विषयी बोलताना हार्मोन वेलनेस क्लिनिक्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश ब्राम्हणकर म्हणाले,
हार्मोन हब म्हणजेच हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि वेलनेस सेंटर ही एक अशी अभिनव संकल्पना आहे की,
ज्यात आपल्या हार्मोन्स च्या समस्यांवर तज्ञाकडून एलोपथीं उपचार तर होतीलच, परंतु त्यासोबत म्युझिक थेरपी,
प्राणिक हिलिंग,कौन्सेलिंग प्रोग्राम्स,आहाराचा सल्ला तसेच लाइफ कोचिंग आदि वैविध्यपूर्ण दृष्टीकोनातून रुग्णाचा सर्वांगीण उपचार केला जाईल.

 

Web Title :  Pune Hormone Hub | Inauguration of India’s first innovative hormone replacement and wellness center in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा