पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील बंगल्यात घुसून चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशखिंड रस्त्यावरील एका बंगल्यात शिरुन चोरट्यांनी पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपुर्वी पहाटे तीन वाजण्याच्या सुामरास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शाम परुळेकर (वय 54, रा.रेंजहिल्स रस्ता) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा सर्वप्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास परुळेकर यांच्या बंगल्यातील एका खोलीचा दरवाजा उघडा होता. या दरवाजातून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. तसेच, त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा 2 लाख 70 हजारांचा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव हे करत आहेत.