Pune Incident | ब्रेक फेल झाल्याने चारचाकीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार दुचाकीसह थेट खोल दरीत, कात्रज घाटातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Incident | भरधाव वेगात जाणाऱ्या मिक्सर ग्राइंडरने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार दुचाकीसह 40 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना पुण्यात (Pune Incident) घडली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास कात्रजच्या जुन्या घाटात (katraj ghat pune) घडली आहे. अलिम मुजावर (Alim Mujawar) असं जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ब्रेक फेल (Break failed) झाल्याने हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकरा वाजता मिक्सर ग्राइंडर (Mixer Grinder) ही चारचाकी कात्रज जुन्या घाटातून पुण्याकडे येत असताना ब्रेक निकामी झाले. त्यामुळे पुढे चाललेल्या दुचाकीस्वारास धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार 40 फूट खोल दरीत कोसळला. दुचाकी सुरक्षा भिंतीला अडकून मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस (bharati vidyapeeth police station) आणि कात्रज अग्निशमन केंद्रातील (Katraj Fire Station) जवान चालक अनंता जागडे, फायरमन रमेश मांगडे, तेजस मांडवकर, शिवदास खुटवड, देवदूत चालक रुपेश जांभळे फायरमन शुभम शिर्के, निलेश तागुंदे, मंदार, राजेंद्र भिलारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरीत कोसळलेल्या दुचाकीस्वारास बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

हे देखील वाचा

Phone Tapping case | वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्लांचं ‘एफआयआर’ मध्ये नावचं नाहीय

14 सप्टेंबरपर्यंत SBI मध्ये करा स्पेशल डिपॉझिट, जास्त व्याजासह मिळतील अनेक मोठे फायदे; जाणून घ्या

Crime News | हनीट्रॅपद्वारे दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा गंडा; यवतमाळमधील एकास अटक

Jalgaon Crime | नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर; आर्थिक गुन्हे शाखेकडून मुख्य सुत्रधाराला अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Incident | Four-wheeler collides with two-wheeler due to brake failure; Incident in Katraj Ghat, in a deep valley directly with a two-wheeler rider

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update