Pune ISIS Module Case | पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणातील आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा, दहशतवाद्यांचे कोडवर्ड शरबत, रोजवॉटर अन्…

सर्व आरोपी उच्चशिक्षीत, बड्या आयटी कंपनीत नोकरी; 31 लाख रुपये वर्षिक पगार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात इसिस मॉड्यूल (Pune ISIS Module Case) प्रकरणात आरोपपत्र दाखल (Chargesheet) करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने National Investigation Agency (NIA) हे आरोप दाखल केले आहे. यामध्ये इसिस मॉड्यूलचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून (Serial Bomb Blast In Pune) आणण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता (Terrorist Arrest In Pune). त्यासाठी त्या दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, असा दावा एनआयएने केला आहे. (Pune ISIS Module Case)

सर्व आरोपी उच्चशिक्षित

इसिस प्रकरणातील सर्व आरोपी उच्चशिक्षित असून लाखो रुपये कमवायचे, असे आरोपपत्रात म्हटले आहे. यातील जुल्फीकार अली हा आरोपी एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला होता. त्याला वर्षाला 31 लाख रुपये पगार होता. उर्वरित आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनिअर होता. त्यामुळे त्याला स्फोटकांचं चांगल ज्ञान होतं, असाही दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. (Pune ISIS Module Case)

गुन्ह्यातील तीसरा आरोपी कादीर पठाण पुण्यात ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. त्याने सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना इम्रान खान आणि युनूस साकी यांना ग्राफिक डिझाईनचे काम शिकवले होते. आरोपी ओळख लपवण्यासाठी वेगवेगळी कामे करुन पैसे कमवत होते, असेही आरोपपत्रात नमूद केले आहे.आरोपींना मोहम्मद नावाचा एक हँडलर ऑपरेट करत होता. तसेच आयईडी बॉम्ब बनवण्याचं काम आरोपीकडून युद्धपातळीवर सुरु होते.

दहशतवाद्यांचे कोडवर्ड

आरोपींनी आयईडी स्फोटक बनवण्यासाठी केमिकल्स खरेदी केले होते. केमिकल्ससाठी ते कोडवर्ड्सचा वापर करत होते,
असा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. आरोपी सल्फरिक एसिडसाठी विनेगार, अ‍ॅसेटॉनसाठी रोजवॉटर
आणि हायड्रोजन पेरॉक्साइडसाठी शरबत हा कोडवर्ड वापरत होते, असं आरोपपत्रात नमूद केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Police News | पोलीस शिपायाकडून महिला पोलीस शिपाईसोबत गैरवर्तन, मानसिक त्रास देऊन बदनामी करण्याची धमकी; मुंबई पोलीस दलातील प्रकार

Manoj Jarange Patil | मरोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा, १५ नोव्हेंबरपासून सुरूवात; अशी आहे रूपरेषा…

NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज दुपारी सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार