NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज दुपारी सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार

नवी दिल्ली : NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) हक्क सांगितल्यानंतर आता हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) आहे. याबाबत आयोगात आज दुपारी ४ वाजता सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांसाठी आजची सुनावणी महत्वाची असली तरी अजित पवार गटाकडून सुनावणीसाठी कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. (NCP Hearing Today in Supreme Court)

निवडणूक आयोगासमोरील आजच्या सुनावणीला ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awad) हे उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्याच्या दृष्टीने ही सुनावणी महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर आपल्या गटासह महायुतीत जाणे पसंत केले. त्यानंतर या गटाने पक्षावर देखील हक्क सांगितला. आता राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. (NCP Hearing Today in Supreme Court)

राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर ते थेट सत्ताधारी महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या सोबतच्या काही आमदारांना मंत्रिपदे मिळाली. त्यानंतर काहीच दिवसात अजित पवार गटाने पक्षावर देखील हक्क सांगितला होता.

दरम्यान, आमदार अपात्रतेचे (MLA Disqualified) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे
देखील सुनावणीसाठी आहे. यावर ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मात्र, अजित पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे १ महिन्याची मुदत मागितली आहे.
हा निर्णय देखील अजित पवार गटाचे राजकीय भविष्य ठरवणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Firing News | धक्कादायक! पुण्यात सराफा व्यवसायिकावर गोळीबार करुन दागिन्यांची बॅग पळवली, हल्लेखोरांनी झाडल्या 6 गोळ्या

Pune Crime News | ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील तरुणीची फसवणूक

Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार