Pune Kasba Peth Bypoll Election | रविंद्र धंगेकर यांनी घेतली शरद पवारांची भेट, गेमचेंजर शरद पवार उतरणार प्रचारात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान (Voting) होणार आहे. यासाठी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. गुरुवारी भाजपने कसब्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट (Girish Bapat) यांना प्रचारात उतरवले. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शुक्रवारी (दि.17) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत होत असून या दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. ही निवडणुक चुरशीची होणार असून भाजप आणि मविआने प्रचारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा, रॅलीचे आयोजन केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे देखील कसबा आणि चिचंवडच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

 

दरम्यान, आज सकाळी रविंद्र धंगेकर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार साहेबांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने निवडणुकीत मला विजयाची पूर्ण खात्री आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने एकदिलाने काम करत संपूर्ण यंत्रणा माझ्या पाठीशी उभी केली असल्याने आपला विजय हा निश्चित असल्याचे रविंद्र धंगेकर यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) व विठ्ठलशेठ मणियार (Vitthalsheth Maniyar) हे देखील उपस्थित होते.

 

शरद पवारांची 22 तारखेला सभा
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election) प्रचारासाठी उतरणार आहेत.
कसबा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांची सभा येत्या 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 ते 9 या वेळेत होणार आहे.
या दोन्ही ठिकाणी शरद पवार सभा घेणार आहेत. यावेळी ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गिरिश बापट यांना कसब्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जाते.
तर शरद पवारांना निवडणुकीतील गेमचेंजर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शरद पवार यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | kasba chichwad bypoll election sharad pawar rally on 22 feb 2023

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rudraksh Mahotsav in Sehore | धक्कादायक! रुद्राक्ष महोत्सवामध्ये झालेल्या धक्काबुक्कीत बुलडाण्यातील 3 महिला बेपत्ता

Pune Crime News | पत्नीचा गळा दाबून खून करुन पतीने विष प्राशन करुन केला आत्महत्येचा प्रयत्न

Pune Crime News | अभ्यास करताना मोबाईल पाहतो, म्हणून रागविल्याने १२ वीतील मुलाने आईचा गळा दाबून केला खून, पुण्यातील घटना