Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यात भाजपचं टेन्शन वाढलं? ‘किंगमेकर’ ची प्रचारातून माघार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. याठिकाणी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यात थेट लढत होणार आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. याचदरम्यान भाजपच्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि कसबा पोटनिवडणुकीचे किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने प्रचारातून माघार घेतली आहे. यामुळे भाजपचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून भाजपचे गिरीश बापट (MP Girish Bapat) यांची प्रकृती खराब आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती गिरीश बापट यांनी पत्राद्वारे दिली आहे.

 

कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये मागील अनेक वर्षांपासून गिरीश बापट यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांना किंगमेकर असे म्हटले जाते. मुक्ता टिळक यांच्यावेळी देखील बापटांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र, पोटनिवडणुकीच्या वेळी त्यांनी आपल्या आजारपणाचे कारण पुढे करत घरोघरी जाऊन प्रचार करु शकत नसल्याचे सांगत, निवडणुकीच्या प्रचारातून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गिरीश बापट यांची भेट घेत घेतील होती.
त्यांनी बापटांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यावेळी कसब्याचं टेन्शन घेऊ नका नक्की आपणच जिंकू, असा विश्वास बापट यांनी मुख्यमंत्र्यांना दिला होता.
परंतु त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी प्रचारातून माघार घेतल्याने भाजप प्रचारासाठी नेमकं काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | pune bypoll election bjp mp girish bapat will not campaign for kasba vidhan sabha by election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

All India Public Sectors Football Tournament | अखिल भारतीय पब्लिक सेक्टर फुटबॉल स्पर्धा; ऑईल इंडिया लिमिटेड संघाला विजेतेपद

Keshav Upadhye | ताई, महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? भाजपचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल