Pune Kasba Peth Bypoll Election | आजारी असतानाही गिरीश बापटांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचारता सहभाग घेतला. ते ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले होते. यानंतर आज पोटनिवडणुकीसाठी मतदान केले. गिरीश बापट यांनी अहिल्यादेवी शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला.

आजारी असताना देखील गिरीश बापट यांनी प्रचारात हजेरी लावली. त्यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रीय अधिकार बजावण्यासाठी बापट हे मतदानासाठी पोहोचले. कसबा निवडणूक  भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.

पेढे भरवायला मीच येईल

दरम्यान, कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना गिरीश बापट म्हणाले होते, 1968 नंतर मी पहिल्यांदा निवडणुकीत सक्रिय
नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला अनेक वेळा जिंकून अनेक वेळा हरलो. पण पक्ष संघटन राहिले.
ही निवडणूक चुरशीची नाही, ही निवडणूक आपल्या चांगल्या मतांनी जिंकणार आहोत.
कर्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कर्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे.
मी गेली अनेक वर्ष त्या आत्म्याची सेवा करण्यात धन्यता मानत आहे. आपला उमेदवार नक्की जिंकणार आहे.
हेमंत (Hemant Rasane) चे काम चांगले आहे थोडे नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे.
मी बरा होऊन परत येईल, विजयी झाल्यावर पेढे भरवायला मीच येईल असा विश्वास गिरीश बापट यांनी यावेळी व्यक्त केला होता.

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | Pune kasba bypoll election mp girish bapat even reached through illness to vote