Pune Kasba Peth Bypoll Election | कसब्यातील व्यापारी शत प्रतिशत भाजपच्या पाठीशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा मतदार संघातील व्यापारी वर्गाने भारतीय जनता पक्षाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना आणि इतर घटक पक्षाच्या युतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) हे कसबा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवित आहेत. त्यांच्या उमेदवारीला कसबा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागांमधील व्यापारी संघटनांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. (Pune Kasba Peth Bypoll Election)

 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आज सकाळी मध्य पेठांमधील विविध व्यापारी संघटनांसमवेत संवाद साधला. याप्रसंगी या संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजप आणि हेमंत रासने यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मेरा परिवार, भाजप परिवार, माझे कुटुंब भाजप कुटुंब अशा आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

 

सुलभ आणि भयमुक्त व्यापार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या योजनांचे यावेळी पुन:श्च स्वागत करण्यात आले.
तसेच, देशाचे प्रेरणादायी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय व्यापाराच्या होत असलेल्या भरभराटीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
स्थानिक पातळीवर पुण्याच्या मध्यवस्तीतील व्यापारी पेठांमधील समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने कार्यरत आहे.
तसेच भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा कायमच व्यापारी वर्गाला आधार राहिला आहे, याचाही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आवर्जून उल्लेख केला.

 

Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | The traders of the town are 100 percent behind the BJP

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वाहनात सापडली लाखोंची रक्कम, स्वारगेट परिसरातील घटना

Pune Traffic Updates News | शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’