Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | पुण्याच्या कात्रज परिसरात 20 सिलेंडरचे स्फोट ! अवैध सिलेंडरचा मोठा साठा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Katraj LPG Gas Cylinder Blast | पुण्यातील (Pune Crime) कात्रज परिसरात काल (मंगळवारी) जवळपास 20 गॅस सिलेंडरचे स्फोट (Pune Katraj LPG Gas Cylinder Blast) झाले. या धक्कादायक घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान गॅस एजन्सीजच्या साहाय्याने काळ्या बाजारात (LPG Gas Cylinder Black Market) होणाऱ्या गॅस विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा वर आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे (Pimpri-Chinchwad) मागील काही दिवसात पुरवठा विभागाने तब्बल 198 अवैध सिलेंडर जप्त केले आहेत.

 

पुण्यातील कात्रजच्या टेकडीचा परिसर काल 20 गॅस सिलेंडरच्या स्फोटानी हादरून गेला आहे. एका पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवण्यात आलेल्या गॅस सिलिंडरने (LPG Gas Cylinder) अचानक पेट घेतला आणि गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठवणूक कशी केली जाते हे पुन्हा एकदा वर आलं. मात्र अशाप्रकारे घरघुती वापराच्या गॅसची साठवणूक करण्याची ही एकमेव घटना नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या 2 शहरांत मिळून 8 अवैध साठ्यांवर कारवाई करुन 198 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.

 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती वापराच्या गॅसच्या पुरवठ्यासाठी 118 गॅस एजन्सी आहेत.
पण, या गॅस एजन्सीजकडून वितरीत होणारे सिलेंडर अधिकृत गॅस धारकांपर्यंत पोहचत नसल्याच निदर्शनास येत आहे.
दरम्यान, या काळ्या मार्केटमध्ये गॅस एजन्सीज बरोबर पोलीसही सहभागी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कारण कात्रजमधे जिथे हे स्फोट झाले, त्या ठिकाणी अनेकदा पोलीस (Police) तपासणीसाठी येत असल्याचे समोर आलं होतं,
परंतु, त्यांनी प्रत्यक्षात काहीच न केल्याचे स्थानिकाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अनेकवेळा घरघुती वापराच्या गॅस सिलिंडरमधुन गॅस काढून ते छोट्या सिलेंडरमध्ये भरुन ते विकण्याचे प्रकारही घडत आहेत.
पण असं करणं जीव धोक्यात येऊ शकतो. कात्रज परिसरातील या स्फोटांमधे सुदैवाने कोणती जीवीतहानी झाली नाही.
पण, भविष्यातील हानी रोखायची असेल तर गॅस एजन्सीजच्या सहाय्याने चालणाऱ्या या काळ्या बाजाराला पोलीस
आणि पुरवठा विभागाकडून चाप लावण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.

 

Web Title :- Pune Katraj LPG Gas Cylinder Blast 198 illegal cylinders were seized after 20 cylinders exploded in pune katraj

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना नाराज केलं जातंय, कधीतरी स्फोट होणार’ – रावसाहेब दानवे

 

Pune Aam Aadmi Party | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी पुण्यात ‘आप’कडून भाजपचा निषेध

 

Pune Crime | पुण्यात कॅफे चालवणाऱ्या महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी, दुकान मालकावर FIR