Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना नाराज केलं जातंय, कधीतरी स्फोट होणार’ – रावसाहेब दानवे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raosaheb Danve | महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले तरी अनेक कुरबुरी ऐकायला येतात. मात्र आता झालेल्या निधीवाटपानंतर (Allocation of Funds) काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. याचाच धागा पकडत भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे.

 

शिवसेना केवळ मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी राज्यभरातील आमदारांची नाराजी ओढवून घेत आहे. त्यामुळे कधी ना कधी महाविकास आघाडीत स्फोट होईलच, असा दावा रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला आहे. मुंबई भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

 

महाविकास आघाडीमध्ये फक्त नियुक्त्यांवरून नाराजी नाहीतर निधीवाटपावरूनही त्यांच्यात समन्वय नाही.
त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी येणं तर लांबच राहिलं पण महाविकास आघाडी टिकवणं अवघड आहे.
ही गोष्ट आता शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या लक्षात येऊ लागली असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
यावेळी भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

 

दरम्यान, शिवसेनेतील 90 टक्के आमदार नाराज आहेत. महाविकास आघाडीत केवळ राष्ट्रवादी (NCP) खूश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांना स्वयंपूर्ण करत असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
त्यासोबतच काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांची नाराजी लक्षात राष्ट्रवादीने 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचं लक्ष्य निश्चित केलं असल्याचंही बावनकुळे म्हणाले.

 

 

Web Title :- Raosaheb Danve | shivsena take big risk for cm post disappointed own mlas maha vikas aghadi will topple soon says raosaheb danve

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shreemant Dagdusheth Halwai Music Festival | यंदा गुढीपाडव्यापासून प्रारंभ होणार श्रीमंत ‘दगडूशेठ’चा संगीत महोत्सव; 9 दिवस रंगणार कार्यक्रम

 

Nikki Tamboli Killer Look | निक्की तांबोलीनं रिवीलिंग गाऊन घालून दिला बोल्ड लूक, फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ 

 

Pune Corporation | अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍या ‘त्या’ बड्या राजकिय कार्यकर्त्यावर गुन्हा नाही ?, उलटसुलट चर्चा सुरू