Pune Khadki News | पुणे : खून करुन मुळा नदीपात्रात जाळला तरुणाचा मृतदेह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Khadki News | खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात (Mula River) एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केलेल्या तरुणाची ओळख पटू नये व पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह जाळला. मृतदेह नवीन खडकी ब्रीजच्या खाली मुळा नदीच्या पात्रातील जलपर्णी मध्ये आढळून आला आहे. (Dead Body Found In Mula River)

याबाबत पोलीस अंमलदार शशांक सुरेश डोंगरे यांनी खडकी पोलीस ठाण्यात (khadki Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी 302, 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी खडकी परिसरातील मुळा नदीपात्रात एकाचा मृतदेह सापडला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

घटनेची माहिती मिळताच खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाची ओळख न पटण्यासाठी तो जाळण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवला. दरम्यान, पोलिसांकडून मृत तरुणाची ओळख पटवण्यात येत आहे. या तरुणाचा खून कोणी व कोणत्या कारणामुळे केला याचा तपास खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करीत आहेत.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 विजयकुमार मगर
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर, सहायक पोलीस आयुक्त खडकी
विभाग आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे,
सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी