Pune Kondhwa Crime News | कोंढव्यातील मसाज पार्लरवर विशेष शाखेचा छापा, व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 4 महिलांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime News | अवैधरित्या पुण्यात वास्तव्य करणाऱ्या चार परदेशी महिलांवर (Foreign Women) कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या (Pune Police Special Branch) परकीय नागरीक नोंदणी शाखेने शुक्रवारी (दि.24) ही कारवाई केली. या महिला बिझनेस व्हिसावर (Business Visa) भारतात आल्या होत्या व नोकरी करण्याचा वैध व्हिसा नसताना (Pune Kondhwa Crime News) मसाज पार्लरमध्ये नोकरी करीत होत्या.

 

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या (Pune Police Commissionerate) हद्दीत परदेशी महिला बिझनेस व्हिसावर येऊन नोकरी करत असल्याची माहिती परकीय नागरिक नोंदणी शाखेला (FRO, Pune City) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील एका खासगी मसाज पार्लरवर छापा टाकून 4 महिलांना ताब्यात घेतले. (Pune Kondhwa Crime News)

 

पोलिसांनी या कारवाईत स्पा सेंटरचे जागा मालक, चालक आणि मॅनेजर यांच्यावर विदेशी व्यक्ती अधिनियमांतर्गत (Foreign Persons Act)
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
तर ताब्यात घेण्यात आलेल्या चार महिलांना मुंढवा येथील शासकिय महिला सुधारगृह येथे ठेवण्यात आले असून
या महिलांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठवले जाणार मायदेशी पाठवले जाणार असल्याची
माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R. Raja) यांनी दिली.

 

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परकिय नोंदणी शाखेच्या (Foreign Citizens Registration Branch) पथकाने केली.

 

Web Title :- Pune Kondhwa Crime News | Special branch raids massage parlor in Kondhwa, action against 4 women for violating visa rules

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Vidhimandal Adhiveshan | विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन 17 जुलै रोजी मुंबईत

All India Bank Employees Association (AIBEA) | मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात – सी. एच. व्यंकटचलम्

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले- ‘एका अहंकारी व्यक्तीमुळे मुंबईचा…’

Majestic Aamdar Niwas | ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवास वास्तू नूतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन