Pune Kondhwa Crime | पुणे : मंगळसूत्र घालून लग्न केल्याचे भासवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kondhwa Crime | तरुणीसोबत ओळख करुन तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवले. तसेच तिला मंगळसुत्र घालून लग्न केल्याचे भासवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवून फसवणूक (Cheating Farud Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान, कोंढवा, उंड्री, वानवडी, सोलापूर येथे घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) आरोपीला अटक केली आहे.

याबाबत विकासनगर, वानवडी येथील 19 वर्षीय तरुणीने शनिवारी (दि.17) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनिकेत पुनमचंद राठोड (वय-27 रा. एस.आर.पी.एफ. गेट समोर विकासनगर, वानवडी) याच्यावर आयपीसी 376, 376(2) (एन), 417 नुसार गुन्हा दाखल करुन शनिवारी सायंकाळी पाच वाजता अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीसोबत ओळख केली. तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. यानंतर तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे खोटे आश्वासन देवून सोलापूर येथे घेऊन गेला. त्याठिकाणी एका रुममध्ये पीडित तरुणी सोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच मुलीला मंगळसुत्र व लग्नातील साज घालून लग्न केल्याचे भासवले. यानंतर मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी येवून जावून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

लग्न केल्याचे भासवून दिशाभूल करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा पाटील करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त