Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे शानदार उदघाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Kothrud Ganesh Festival 2023 | आम्ही कोथरूडकर (Amhi Kothrudkar) या संस्थे तर्फे परिसरात सातत्याने सामाजिक उपक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातील अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे स्वागताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) आणि दिली. यंदाच्या गणेशोत्सवात सोसायटीत गणेश उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम तुमचा मानधन आमचे असा उपक्रम राबविला जात आहे, यास प्रतिसाद देखील मिळत आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले. (Pune Kothrud Ganesh Festival 2023)

आम्ही कोथरूडकर’तर्फे आयोजित व ‘संवाद पुणे’ निर्मित कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे उदघाटन रविवारी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे स्वागताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) अध्यक्षस्थानी होत्या.

राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनिल तटकरे (Sunil Tatkare), महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर (Rupali Chakankar), अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले (Meghraj Bhosale) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजक, पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar), भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मंदार जोशी (Adv Mandar Joshi), ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन (Sunil Mahajan), व महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचिव किरण साळी (Kiran Sali), माजी नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर (Manjushri Sandeep Khardekar) आणि ॲड अर्चिता मंदार जोशी (Adv Archita Mandar Joshi), रोटरी च्या ऋचा वझे आणि प्रिया देवधर उपस्थित होते. (Pune Kothrud Ganesh Festival 2023)

कार्यक्रमाच्या प्रारंभी कोथरूड गणेश फेस्टिव्हलच्या मान्यवरांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. तसेच यावेळी आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटवृक्षाला पाणी घालून फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात आले.

समाजात विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणारे प्रवीण बढेकर (उद्योजक), संजय चोरडिया (शिक्षण), डॉ. जितेंद्र जोशी (आंतरराष्ट्रीय उद्योजक), , पं. विजय घाटे (तबला), देवेंद्र गायकवाड, (अभिनेता–दिग्दर्शक) यांना मान्यवरांच्या हस्ते “कोथरुड सन्मान” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, पंढरपूर वारी मार्गावर योगेश सोमण यांच्या नाटकाचे प्रयोग करण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. कोथरूड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका घेण्यात आला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळला. नेहमीच कोथरूडच्या विकासात भर टाकीत राहील, असेही यावेळी ते म्हणाले.

सुनील तटकरे म्हणाले, सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आता नव्याने व्यापत आहे. नव्या युगात सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहे. कोथरूडमध्ये चंदकांतदादा जोमाने काम करीत आहे. महर्षी कर्वे यांचे शैक्षणिक कार्य कोथरूडकर पुढे नेत आहे.

निलमताई गोऱ्हे म्हणाल्या, कोथरूड मधील विकासाचे कामे चंद्रकांतदादा वेगाने करीत आहे. त्यांचा एकूणच राजकीय, सामाजिक कामाचा अनुभव कोथरूडकरांना मोलाचा ठरत आहे. केंद्र आणि राज्य सरकार महिलांसाठी चांगले निर्णय घेत आहे. लोकसभेत महिलांना आरक्षण मिळाले आहे. महिला सर्व क्षेत्रात पुढे जात आहे. आयोजक ॲड मंदार जोशी यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, कोथरूड मध्ये आनंदाची पर्वणी साजिरी करीत आहे. विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील वर्षी भव्य स्वरूपात हा कोथरूड फेस्टिव्हल या पेक्षा भव्य भरविण्यात येईल .

दीपक मानकर म्हणाले, लोकमान्यांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव कोथरूड गणेश फेस्टिव्हल च्या माध्यमातून राबविला जात आहे. दरवर्षी वेगळा कार्यक्रम या मध्ये होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान देखील केला जाईल. चंद्रकांतदादा कोथरुडकरांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात असेही यावेळी ते म्हणाले.

संदीप खर्डेकर म्हणाले, महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन हा फेस्टिव्हल साजरा करीत आहे. पुढील वर्षी आणखी मोठे स्वरूप याला देणार आहोत. नवरात्रोत्सव मध्ये महिलांसाठी दांडिया चा कार्यक्रम घेतला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी व आभार प्रदर्शन सुनील महाजन यांनी केले. कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन ‘आम्ही कोथरूडकर’ यांनी आयोजित केले असून ‘संवाद पुणे’ यांची निर्मिती आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. तसेच या सह पुढील सर्व कार्यक्रम देखील रसिकांसाठी विनामूल्य आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’

Sanjay Kakade | हा फक्त सत्कार; शाब्बासकी लोकसभा व विधानसभा जिंकल्यावर ! संजय काकडेंच्या वतीने
पुणे शहर भाजपा च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार