Sanjay Kakade | हा फक्त सत्कार; शाब्बासकी लोकसभा व विधानसभा जिंकल्यावर ! संजय काकडेंच्या वतीने पुणे शहर भाजपा च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळेंची उपस्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Kakade | शहर भाजपाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद मिळाल्याचे जे पत्र मिळाले आहे ते केवळ पत्र नसून ती जबाबदारी आहे. याची जाणीव त्यांनी ठेवून जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे. आणि येणाऱ्या लोकसभा (Pune Lok Sabha) व विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Elections) पुण्याचा भाजपचा (Pune BJP) खासदार साडेतीन लाखाच्या फरकाने आणि सर्व आठ विधानसभा मतदार संघात भाजपचा आमदार निवडून आणला तर, तुम्हा सर्वांना शाब्बासकी देतो. आज होत असलेला हा केवळ सत्कार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार आणि भाजपाचे नेते संजय काकडे यांनी केले. (Sanjay Kakade)

शहर भाजपाच्या नवनिर्वाचित 50 पदाधिकाऱ्यांचा माजी खासदार व भाजपाचे नेते संजय काकडे यांच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande) , शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) आदी मान्यवर उपस्थित होते. (Sanjay Kakade)

शहर भाजपाचे 50 नवनियुक्त पदाधिकारी आहेत. प्रत्येकाने 2 हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी एक कुटुंबापर्यंत पक्षाचे धोरण, विचारसरणी, मोदीजींचे गेल्या 9 वर्षातले कार्य, संघाचे काम पोहोचवण्याचे ठरवले तर, एक लाख कुटुंबापर्यंत आपण पोहचू शकतो. त्यातून लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची बांधणी उत्तम होऊ शकते. मिळालेल्या संधीचे पदाधिकाऱ्यांनी सोनं करावे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडिया गट कायम राहिला तर, उमेदवार वैयक्तिक ताकदीचा असावा असा विचार वरिष्ठ नेते करतीलच परंतु, आज प्रत्येक घरात कमळ पोहोचवण्यासाठी काम करा, असेही संजय काकडे म्हणाले.

मिळालेल्या पदाचा उपयोग संघटना वाढीसाठी, संघटनेत चांगले लोक निर्माण करण्यासाठी केला पाहिजे हे सांगताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुजरात मध्ये कार्य केलेल्या इनामदार गुरुजींचे उदाहरण दिले. शहरात काम करताना कोणताही गटतट न पाडता पक्षासाठी आणि मोदींसाठी सर्वांनी काम करा, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

यावेळी प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.

संजय नाना काकडे हे असं रसायन…

पुणे शहर भाजपाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संजय नाना काकडे यांनी सत्कार करून
आमच्यातील ऊर्जा वाढविली आहे. संजय नाना हे असं रसायन आहे की जे पुण्याच्या राजकारणात चमत्कार घडवू शकते.
त्यांची ताकद खूप मोठी आहे. त्यांना संघटनेमध्ये मोठी व महत्त्वाची जबाबदारी पक्षाने द्यावी असे आम्हाला वाटते, असे मत पुणे शहर भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’