Pune Lashkar Crime | पुणे : रोजा सोडण्यासाठी ताट धुण्यास सांगितल्याने तरुणावर वार, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lashkar Crime | रोजा सोडण्यासाठी जेवणाचे ताट धुण्यास सांगितल्याने एका तरुणाला सोडा बॉटल व धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.22) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कॅनरा बँकेच्या समोरील दुचाकी पार्किंग मध्ये घडला आहे. (Pune Lashkar Crime)

यबाबत अल्तमश इरफान सय्यद (वय-18 रा. मिठानगर, कोंढवा) याने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन उमेर आसिफ खान उर्फ मेंढा याला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 324, 323, 427, 504, 506, 34, सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी आरोपीला रोजे सोडण्याच्या जेवणाचे ताट धुण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्य़ादी व त्यांच्या भाऊ व मित्राला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी तरुणाला सोडा बॉटल व धारदार हत्याराने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना सी.आर.पी.सी 41(अ)(1) प्रमाणे नोटीस बजावली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दुचाकीवरुन जाणाऱ्या दोघांना मारहाण

कोंढवा (Kondhwa): दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुण व तरुणीला आडवून एवढ्या रात्री रस्त्यावर का फिरता असे म्हणत बेदम मारहाण केली. हा प्रकार शनिवारी (दि.23) रात्री पावणे एकच्या सुमारास कोंढवा परिसरातील पारगेनगर येथील सिटी लॉन्स जवळ घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच अनोळखी मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सार्थक शितलकुमार गांधी (वय-22) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्य़ादी व त्यांचे मित्र राहील शेख व मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन जात होते.
सीटी लॉन्सजवळ फिर्यादी यांच्या पाठिमागून तीन दुचाकीवरुन पाच जण आले.
त्यांनी एवढ्या रात्री का रस्त्यावर फिरत आहात,
असे म्हणून फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आरोपीपैकी एकाने फिर्य़ादी यांच्या डोळ्यावर बुक्की मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”