Pune Lok Sabha By Elections | पुणे लोकसभेची जागा भाजपाची पण अजित पवार गट देखील इच्छूक, ‘या’ नेत्याचे वक्तव्य चर्चेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha By Elections | भाजपाचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late MP Girish Bapat) यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येथे लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश काल मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिल्यानंतर येथील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. विशेष म्हणजे ही जागा भाजपाची असताना मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) नेत्याने आपण देखील या जागेसाठी इच्छूक असल्याचे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Pune Lok Sabha By Elections)

अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पुणे लोकसभेच्या पोट निवडणुकीबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मानकर यांनी म्हटले आहे की, अजित पवारांनी महायुतीत जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मागितली तर आपण लोकसभेची पोटनिवडणूक लढू. (Pune Lok Sabha By Elections)

मानकर म्हणाले, राजकीय जीवनात कोणतेही पद हे कायमस्वरूपी नसते. परिवर्तन हा नियतीचा नियम आहे. त्यामुळे अजितदादांनी जर पुण्याची जागा मागायची ठरवले तर लोकसभेचा उमेदवार हा दीपक मानकर असेल. त्यामुळे असे समजू नये की ही जागा भाजपलाच मिळेल.

मानकर म्हणाले, शेवटी शिरस्त नेते मंडळींना हा निर्णय घ्यायचा आहे. अजितदादा जो निर्णय घेतील तसा पक्ष चालेल.
मी इच्छुक असताना माझ्या खासदारकीसाठी जी ताकद वापरणार होतो ती ताकद महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे
लावेन. दीपक मानकर आपण इच्छूक असल्याचे म्हटल्यानंतर पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चर्चा आता रंगू
लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी देखील दीपक मानकर हे पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक होते.
यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली होती. मात्र, मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा विषय
मागे पडला होता. आता कोर्टाच्या निर्देशानंतर पुन्हा एकदा मानकर यांनी ही पोटनिवडणुक लढवण्याची आपली इच्छा
बोलून दाखवली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Job Fair | दत्ताभाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रोजगार मेळावा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भुजबळांवर थेट आरोप, जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्याचा ‘हा’ प्रयत्न

Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने धनकवडी येथील तरुणीची आर्थिक फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीचा काटा काढण्यासाठी आधी विषप्रयोग, नंतर दिली सुपारी; पोलीस तपासात पत्नीचे कारनामे आले समोर