Pune Lok Sabha Bypoll Election | पुण्याची जागा आमचीच, अजित पवारांनी आमचं काम सोपं केलं, नाना पटोलेंचा टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा मदरासंघाच्या पोटनिवडणुकीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) मध्ये जोरदार सस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरले नाही. परंतु जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त असेल, तिथे तोच पक्ष लढेल, ही काँग्रेसची भूमिका मांडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमचे काम सोपे केले आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे. तसेच ताकदीनुसार लढायचे झाले तर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर आमचाच हक्क आहे, असेही पटोले यांनी ठणकावून सांगितले.

काय म्हणाले अजित पवार?

पुण्याच्या पोटनिवडणुकीवर (Pune Lok Sabha Bypoll Election) बोलताना अजित पवार म्हणाले, पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरवताना महाविकास आघाडी अंतर्गत चर्चा करु असं म्हटलं. तसेच जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल. पुणे शहर आणि जिल्ह्यात नेहमीच आमची ताकद राहिली आहे. त्यामुळे ती जागा कोणाला सोडणे हा वाद होऊ शकत नाही. निवडणुकीची रणनिती ठरवताना जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

अजित पवारांनी माझीच भूमिका घेतली

नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीतील जागावाटपाची आपली पहिली भूमिका बदलून अजित पवार यांनी गुणवत्तेनुसारच जागावाटपाची माझीच भूमिका घेतली आहे. कोणाची किती ताकद आहे, यानुसार जागावाटप करण्याचे सांगून अजित पवारांनी आमचा प्रश्न सोपा केला असल्याचे सांगत पटोले यांनी पुण्याच्या जागेवर काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगितले.

पटोले पुढे म्हणाले, पुण्यातील विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या जागा अतिशय कमी फरकाने हरलो आहोत.
आमच्या तुलनेत राष्ट्रवादीने हरलेल्या जागांमधील मतांचा फरक जास्त होता.
लोकसभा मतदारसंघानुसार पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे.
त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाचा निर्णय गुणवत्तेनुसार होईल.
येत्या 2-3 जूनला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. त्यावेळी यावर चर्चा करु असे पटोलं यांना सांगितले.

Web Title : Pune Lok Sabha Bypoll Election | nana patole said that seat of pune loksabha belongs to congress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात मैत्रीणीकडून ‘जीवलग’ मित्राची चाकूने सपासप वार करून हत्या

Wrestlers Protest | बृजभूषण सिंह यांना का पाठीशी घातलं जातंय?, कुस्तीपटूंवरील कारवाईवर ठाकरे गटाचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा की राष्ट्रवादीचा?, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics News | जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गरज नाही, भुजबळांनी टोचले नेत्यांचे कान

Pune News | आराखडा आणि निधी तयार असूनही का रखडले आहे ससून रूग्णालयाचे नूतनीकरण ?