Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग ! मोहन जोशी, रविंद्र धंगेकर यांनी घेतली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election 2024 | पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला असून याबाबत काँग्रेसचे नेते मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi), काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. १९) भेट घेवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी (ता. १६) लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली. मात्र, भाजपकडून आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत आहे. यातून ते सुरवातीच्या दिवसापासून निवडणूक हायजॅक करू पाहत आहेत. आचारसंहिता लागू असताना शहरातील गल्लीबोळातील भिंतीवर कमळाचे चित्र भाजप (BJP) रंगवत आहे. आजही हे ‘विद्रुपीकरण’ सुरू आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवर घालून दोषींवर योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी मागणी आम्ही यावेळी केली.(Pune Lok Sabha Election 2024)

भाजपचे हे षडयंत्र

काँग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की आदर्श आचारसंहिता लागू होते. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागते. त्यानुसार भाजपवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचे जागोजागी रंगवलेले चित्र ७२ तास उलटल्यानंतरही कायम आहे. शहरात ठिकठिकाणी असे प्रकार पहायला मिळत आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून निवडणुका लढवण्याचे भाजपचे हे षडयंत्र आहे. ते आम्ही याआधी कसबा निवडणुकीत पाहिले होते. तरीपण विजय आमचाच झाला होता. हे भाजपने लक्षात ठेवावे, असेही ते यावेळी म्हणाले.

…तर हाताचा पंजा भेट देऊ

शहरातील शासकीय जागेवर ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे कमळाचे चिन्ह रंगवण्यात आले आहे.
आचारसंहितेचे हे उल्लंघन आहे. त्यामुळे कारवाई बरोबरच या भिंती साफ झाल्या पाहिजेत.
पुढील २४ तासात भिंतीवरील कमळ पुसले गेले नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू.
भाजपवर कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताचा पंजा भेट देऊ, अशी भूमिका आमदार रविंद्र धंगेकर
यांनी यावेळी मांडली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Maharashtra Mahayuti Govt | राज्य विकासात मागे आणि गुन्हेगारीत पुढे, रोहित पवारांची महायुती सरकारवर टीका

Pune Khadki Crime | अनैतिक संबंधातुन खडकी परिसरात तरुणाचा खून, आरोपीला 24 तासात अटक

Pradeep Sharma | लखन भैया बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा

Pimpri Dighi Crime | पिंपरी : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Kothrud Crime | ज्यूस विक्रेत्याला मारहाण, एकाला अटक, कोथरुड परिसरातील घटना