Pune Lok Sabha Election | काँग्रेस पुण्यात ओबीसी उमेदवार देण्याची शक्यता, भाजपाला शह देण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Lok Sabha Election | पुणे लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करून भाजपाने (BJP) प्राथमिक टप्प्यात आघाडी घेतली आहे. मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) हे महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला येथील उमेदवार जाहीर केलेला नाही. पुणे लोकसभेची जागा काँग्रेसला (Congress) जाणार असल्याने काँग्रेस येथून कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यानंतरच येथील लढत स्पष्ट होईल.

दरम्यान, सध्या मराठा आरक्षण आंदोलनावरून निर्माण झालेल्या भाजपाविरोधाच्या वातावरणात भाजपाने मराठा उमेदवार देत खेळी खेळली आहे. परंतु, यावर आता काँग्रेसकडून पुण्यात ओबीसी उमेदवार देऊन या खेळीला शह देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा पुणे लोकसभा मतदार संघात आहे.

ओबीसी उमेदवार ठरवण्यासाठीच काँग्रेसला उमेदवार जाहीर करण्यात उशीर होत असल्याची चर्चा आहे.
भाजपाने मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने मराठा उमेदवार दिल्याने काँग्रेसकडून मराठा उमेदवार न देता ओबीसी
उमेदवार दिला जाण्याची शक्यता काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देखील व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून जवळपास वीस इच्छूक उमेदवार आहेत.
या सर्वांच्या मुलाखती प्रदेश काँग्रेस नेत्यांनी घेतल्या आहेत.
यांच्यापैकी कोणत्या ओबीसी उमेदवाराची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024- Maharashtra Cabinet Decisions |लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, 72 तासात तीन मंत्रिमंडळ बैठका अन् 62 निर्णय

Marged Villages In PMC | पुणे : समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 9 लोकप्रतिनिधींची सदस्यपदी नियुक्ती

Pune Dattanagar Double Murder Case | पुण्यात दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस, पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून

PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ